Take a fresh look at your lifestyle.

ओबीसी आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडीचा निषेध !

तालुका भाजपाचे तहसीलदारांना निवेदन.

 

 

पारनेर : ओबीसी समाजाच्या आरक्षण रद्द झाल्यामुळे महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करीत तालुका भाजपाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार गणेश आढारी यांना तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांच्या नेतृत्त्वाखाली नुकतेच निवेदन देण्यात आले.

ओबीसी समाजास राजकीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असलेले समाजाचे आरक्षण राज्य शासनाची नाकर्तेपणामुळे संपुष्टात आले ओबीसी समाजाची राजकीय आरक्षणासंदर्भातराज्य शासनाची कमालीची उदासीनता दिसून येते असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा अशी मागणी वारंवार करूनही आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी सरकारने मागासवर्गीय आयोग नेमला असला तरी देखील सरकारने आयोगाला निधीच दिलेला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

ठाकरे सरकारच्या या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने बुधवारी राज्यभर आंदोलने करण्यात आली भाजपा पारनेर तालुका वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला

निवेदन देताना भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे , जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे,जिल्‍हा सरचिटणीस सुनील थोरात, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब हरिभाऊ चेडे , पारनेर शहराध्यक्ष किरण कोकाटे ,तालुका सरचिटणीस डॉ.अजित लंके, सागर मेैड, भानुदास साळवे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते