Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यात उद्या अवकाळी पावसाची शक्यता !

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी.

मुंबई : डिसेंबर महिन्यात ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती यंदा राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे, तर २७ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आजपासून (६ जानेवारी ) तर ९ जानेवारीपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटवर दिली आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून म्हणजेच ६ जानेवारीपासून मुसळधार पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ६ जानेवारी पासून तर ९ जानेवारीपर्यंत उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरणसह या भागात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील धुळे,नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ६ जानेवारी रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. तर राज्यातील अहमदनगर, धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक, या जिल्ह्यांमध्ये ७ जानेवारी रोजी पाऊस पडणार आहे,
तर राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला पाऊस पडणार असून यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, ९ जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ९ जानेवारीला पाऊस पडणार असून यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला.