Take a fresh look at your lifestyle.

लसीकरण प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करायचं?

सोप्या स्टेप्समध्ये जाणून घ्या!

कोरोना काळात जर लसीकरणाचं प्रमाणपत्र नसेल तर अनेक कामं रखडू शकतात. सध्या तर लसीकरणाचं प्रमाणपत्र असेल तर अनेक ठिकाणी खास सुविधा देखील दिल्या जात आहेत. लसीकरणाचं सर्व काम आधार कार्डाशीच जोडलं गेलंय. त्यामुळे ‘आधार’चा वापर करुन प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करता येईल?
याबाबत जाणून घेऊयात…
लसीकरणाचं प्रमाणपत्र तुम्ही आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्यानं मिळवू शकता. या प्रमाणपत्रावर तुमचे नाव, वय, लिंग, पहिला आणि दुसरा डोस कुठे घेतला? कुणी दिला? कुठे घेतला? याची माहिती नमूद केलेली असते. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर लसीकरणाचं प्रमाणपत्र डाऊनलोड करणं गरजेचं आहे. डिजिलॉकर सॉफ्टवेअरच्या मदतीनं खाली दिलेल्या पद्धतीनं लसीकरणाचं प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
▪️ सर्वातआधी प्ले स्टोअरवर जाऊन DigiLocker Software डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा.
▪️ आता तुमची माहिती (नाव, जन्मतारीख, फोन नंबर, आधार क्रमांक) भरुन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
▪️ यानंतर केंद्र सरकारच्या टॅबवर क्लिक करा. ड्रॉप-डाऊन मेन्यूमधून कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पर्याय निवडा.
▪️ आता तुम्हाला ‘व्हॅक्सिन सर्टिफाईड’ हा पर्याय दिसेल.
▪️ आता लसीकरण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीच्या लिंकवर क्लिक करा. तुमचा आधारकार्ड क्रमांक नमूद करा. यानंतर तुम्हाला कोरोना लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त होईल.