Take a fresh look at your lifestyle.

…आणि जुळ्या मुलांचा जन्म वेगवेगळ्या वर्षांमध्ये झाला!

घडले असे काही की...

गेल्या काही दिवसांपासून जुळ्या भावंडांची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. या जुळ्या भावंडांच्या चर्चेचं कारण काय? असा विचार तुमच्या मनात आला असेल. तर त्याचं कारण म्हणजे या जुळ्यांपैकी एकाचा जन्म 2021 मध्ये झाला तर दुसऱ्याचा 2022मध्ये झाला आहे. 
सविस्तर असे की, अमेरिकेतील एका महिलेने 2021 आणि 2022 या दोन वेगवेगळ्या वर्षांमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिलाय. तिच्या पहिल्या बाळाचा जन्म 31 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजून 45 वाजता, तर दुसऱ्याचा 15 मिनिटांनी म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी झाला. आयलिन आणि अल्फ्रेडो ट्रुजिलो अशी या जुळ्या मुलांची नावं आहेत.
आयलिन ही 1 जानेवारी 2022 रोजी नॅटिविदाद मेडिकल सेंटरमध्ये जन्मलेली जन्मलेली पहिली बाळ ठरली आहे. या जुळ्या मुलांना एकूण तीन मोठी भावंडे आहेत. त्यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. जुळ्या मुलांची आई फातिमा माद्रिगल यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, मी आनंदी आहे की मला जुळी मुलं झालीत आणि महत्वाचं म्हणजे ते जुळे असूनही त्यांचे वाढदिवस वेगवेगळ्या वर्षात आहेत.