Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊनचा सध्या तरी अजिबात विषय नाही !

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण.

मुंबई : डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण अधिक असू नये एवढीच काळजीची गोष्ट आहे. कारण यात मृत्यूदर अधिक आहे. त्यामुळे डेल्टा आणि ओमायक्रॉनचे रुग्ण यांच्यातील प्रमाण समजणे आवश्यक आहे.याबाबतच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.“राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊनचा कोणताही विचार सरकारने केलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य विभागाची तब्बल दोन तासाहून अधिक काळ बैठक झाली. यात लॉकडाऊनचा विषय देखील निघालेला नाही.पण निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत निर्णय घेतले जाऊ शकतात. तसेच सध्या लागू असलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे पालन केले जाईल याकडे लक्ष देण्यावर भर असणार आहे”, असेही राजेश टोपे म्हणाले. लॉकडाउन… लॉकडाउन… असे जरी कोणी म्हणत असेल तरी तो आत्ता नाहीच.
सध्या अजिबात तो विषय नाही. कारण, काल मुख्यमंत्र्यांच्या प्रदीर्घ अशा आरोग्य विभाग व टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत लॉकडाउनची कुठेही चर्चा झालेली नाही.
निर्बंध जरूर वाढवले पाहिजे आणि लॉकडाउनची भाषा आम्ही त्याचवेळी केली की, ज्यावेळी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल, त्या दिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाउन होऊन जाईल. अशा पद्धतीने ठरवण्यात आलेले आहे. त्यामुळे आज इतक्या लवकर लॉकडाउनचा काही विषय नाही.