Take a fresh look at your lifestyle.

अबब ! एकाच झाडाला लागतात 40 वेगवेगळ्या प्रकारची फळं !

कसे शक्य आहे ? ते जाणून घ्या.

 

 

वॉशिंग्टन : आंबा, सफरचंद, केळं, पेरू अशा प्रत्येक फळांचे वेगवेगळं झाडे असते. पण एकाच झाडाला वेगवेगळी फळं लागल्याचे तुम्ही ऐकलं तरी आहे का? तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हे खरं आहे. असं एक झाड आहे, ज्या झाडाला 40 वेगवेगळ्या प्रकारची फळं लागतात ट्री ऑफ 40 असं या झाडाचं नाव आहे.

आपण लहान असताना कदाचित मजा म्हणून एका चित्रामध्ये एकाच झाडावर वेगवेगळी फळं काढली असावीत. पण प्रत्यक्षात हे शक्य नाही हे आपल्याला माहितीच आहे. पण हे अशक्यही शक्यही करून दाखवलं अमेरिकेतील एका तज्ज्ञाने. ज्याने ट्री ऑफ 40 हे झाड तयार केलं. ज्यावर वेगवेगळी फळं लागतात.

सेराक्युज युनिव्हर्सिटीतील सॅम वॉन एकेन यांनी ग्राफ्टिंग हे झाड तयार केलं आहे. या झाडावर 40 फळं लागतात. यामध्ये आंबा, पेरू, जांभूळ, केळी, सफरचंद यांचा समावेश आहे. हे झाड उगवण्यासाठी 9 वर्षे लागली.  2008 साली त्यांनी या झाडावर काम सुरू केलं. आता ते फळा-फुलांनी मोहरू लागलं आहे.

आता तुम्ही निसर्गप्रेमी असाल, झाडांवर प्रेम करत असाल, शेतकरी किंवा फळ उत्पादक असाल तर साहजिकच असं झाड आपल्याकडेही हवं असं तुम्हाला वाटत असेल. हे झाड कसं उगवायचं, त्यासाठी काय करावं लागेल, या झाडाचं रोप कितीला मिळालेल असा प्रश्न तुम्हाला पडले. तर हे झाड उगवण्यासाठी या झाडाची एक फांदीच पुरेशी आहे. पण एका फांदीची किंमत वाचूनही तुम्हाला धक्का  बसेल.  या झाडाची एक फांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 19 लाख रुपये मोजावे लागतील.