Take a fresh look at your lifestyle.

पांडव आणि कौरव कोण आहेत?

प्रत्येकाशी त्याचा संबंध काय आहे?

आपण आत्मानंदाच्या सगळ्या गोष्टी बाहेर शोधत रहातो.एकदा बाहेरची शोधाशोध सुरु झाली कीमग आयुष्य अपुरं पडणार. कारण बाहेरची प्रत्येक गोष्ट पहायला सतत भ्रमण करावे लागेल.कोणताही अनुभव अंतिम नाही. त्याच त्याच चांगल्या वाईट घटना घडल्या तरी प्रत्येक वेळी येणारा अनुभव नवाच असणार.मग परिपुर्णता असणारच कशी?जगण्यात नाविन्य त्याच कारणाने आहे आणि अस्थिरताही त्याच कारणाने आहे.
आम्ही आयुष्यभर पांडव कौरवांना बाहेर शोधत राहिलो.कुरुक्षेत्रावर त्याच्या खुणा शोधत रहातो,भगवंताला शोधत रहातो.वारंवार आम्ही महाभारत ऐकले, एकतो पण त्रयस्थ होऊन. त्यामुळे ते कथानक वाटते.आणि तसं वाटणं साहजिकच आहे. कारण शाश्वत सत्य जडजीवांना पेलणार नाही त्याचा बोध सहज होणार नाही हे जाणुनच संतांनी साहित्य निर्माण केले आहे. हे समस्त मनुष्य कल्याणासाठी आहे.
सज्जनहो आम्हीच पांडव आहोत.मिळालेलं हे शरीर पाच तत्वांनी तयार झाले आहे. पृथ्वी,अग्नी,पाणी,वायु आणि आकाश हे ते पाच पांडव आहेत.यांचं सारथ्य करणारं मन आहे. शरीरात उत्पन्न होणारे विकार म्हणजे कौरव आहेत.
श्रीकृष्ण दुर्योधनाकडेसमेट घडवण्यासाठी गेले होते.पण कौरवांचा प्रमुख दुर्योधनाने ते ऐकले नाही आणि महाभारत घडले.द्रोपदीची यात मुख्य भुमिका आहे.तिचा आपल्याशी काय संबंध हे पुढील भागात पाहु.
रामकृष्णहरी