Take a fresh look at your lifestyle.

पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 

'अशी' असेल निवड प्रक्रिया.

पंजाब नॅशनल बँकने चीफ रिस्क ऑफिसर आणि इतर पदांसाठी भरती काढली असल्याने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  

पद आणि जागांचा तपशील खालीलप्रमाणे :
​चीफ रिस्क ऑफिसर : 1
मुख्य अनुपालन अधिकारी : 1
मुख्य वित्त अधिकारी : 1
मुख्य तांत्रिक अधिकारी : 1
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी : 1
मुख्य डिजिटल अधिकारी : 1
निवड प्रक्रिया कशी असेल? :
● प्राथमिक स्क्रिनिंग असेल.अर्जांसोबत दाखल केलेले पात्रता निकष, उमेदवाराची पात्रता, योग्यता/अनुभव इत्यादींच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केलं जाईल.
● यानंतर आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, उमेदवारी सर्व पदांसाठी तात्पुरती असेल आणि जेव्हा उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी अहवाल देईल तेव्हा सर्व तपशील/कागदपत्रांची मूळ पडताळणीच्या अधीन असेल.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : जनरल मॅनेजर-एचआरएमडी, पंजाब नॅशनल बँक, एचआर डिव्हिजन, पहिला मजला, वेस्ट विंग, कॉर्पोरेट ऑफिसर, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली- 110075.
अर्ज करण्यासाठी उमेदवार PNB ची अधिकृत वेबसाईट pnbindia.in वर जाऊन भेट देऊ शकतात. अर्ज करण्याची मुदत 10 जानेवारी, 2022 पर्यंत आहे.