Take a fresh look at your lifestyle.

…आणि एका महिलेने तीन महिन्यात 2 बाळांना दिला जन्म!

'त्याचे' कारणही असे घडले की...

 

बिहारच्या समस्तीपूर येथील सरकारी रुग्णालयात एका स्त्रीने तीन महिन्यांच्या आत दोन मुलांना जन्म दिलाय. घटना ऐकून थोडे विचित्र वाटेल असेल. सविस्तर प्रकरण जाणून तुम्ही हैराण व्हाल एवढं नक्की..
9 महिन्यांऐवजी केवळ तीन महिने 12 दिवसांच्या अंतराने एका महिलेने दोनदा बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळा मुलाला जन्म दिला आहे. जन्मानंतर आई आणि मूल दोघेही निरोगी आहेत. प्रत्यक्षात असे झाली कि, येथील जननी बाल सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर महिलेने आशा वर्करच्या संगनमताने कागदोपत्री तीन महिने 12 दिवसांत दोनदा दोन अपत्यांना जन्म दिल्याचे सांगितले. या घडल्या प्रकाराची माहिती सिव्हिल सर्जनसह आरोग्य विभागालाही देखील नव्हती.
रेकॉर्डनुसार ही महिला उजियारपूर ब्लॉकमधील हरपूर रेबारी गावची रहिवासी असून तिने वय 28 वर्षे आहे. महिलेने 24 जुलै रोजी उजियारपूर पीएचसीमध्ये मुलाला जन्म दिला. यानंतर त्याच गावातील आशा रीता देवी यांच्या मदतीने 4 नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिला.
उजियारपूर पीएचसीमध्ये नोव्हेंबरमध्ये प्रसूतीनंतर महिलांना जननी बाल सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थींना देण्यात येणार्‍या प्रोत्साहनपर रकमेचा तपशील तयार करताना सदर बाब समोर आली. तपशील तयार करताना सदर महिलेने तीन महिन्यांपूर्वीच बाळंतपण केल्याचे समोर आले. तसेच रुग्णालय प्रशासनाने महिलेला जननी बाल सुरक्षा योजनेंतर्गत दिलेली प्रोत्साहन रक्कमही 31 जुलै रोजी भरली होती. फक्त तीन महिन्यांनी स्त्री पुन्हा जन्म कशी देऊ शकते? त्यानंतर रुग्णालयाचे लेखापाल रितेश कुमार चौधरी यांनी तातडीने चौकशी सुरु केली. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. त्यानंतर तपास पथकाच्या अहवालावर दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आलीय.