Take a fresh look at your lifestyle.

ई-पिक पाहणी ऑनलाईन नोंदणीसाठी सरपंच प्रकाश गाजरे यांची जनजागृती !

शेतकऱ्यांना बांधावर जाऊन केले मार्गदर्शन

 

 

पारनेर : राज्य सरकारने वर्षानुवर्षे चालत आलेल्या महसुल विभागाच्या तलाठ्यांमार्फत परंपरागत पिक पाहणी नोंदणी पध्दतीस छेद देत या वर्षी पासुन माहिती तंञज्ञानाच्या माध्यमातून ई- पिक पाहणी ऑनलाईन नोंदणी प्रकल्पाची एका मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू केली आहे. या ई-पिक पाहणी ऑनलाईन नोंदणी प्रकल्पामध्ये शेतकरी स्वत:च तलाठ्याशिवाय आपल्या ७ / १२ उताऱ्यावर शेतातील पिकांची तसेच बांधावरील झाडांची नोंद करू शकणार आहे. या वर्षिच्या खरिप हंगामातील पिकांची ऑनलाईन नोंदणी ३० सप्टेंबर पर्यंत करणे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे.त्या पार्श्र्वभूमीवर म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी गावातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत तसेच समाज माध्यमातून ई-पिक पाहणी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.

या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी ऑनलाईन नोंदणीचे महत्त्व पटवून देताना शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यासाठी , पिक विम्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी या नोंदणीचा लाभ होणार असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या शेतातील पिकांची ७ / १२ उताऱ्यावर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.

म्हसोबा झाप या गावचे युवा सरपंच म्हणुन प्रकाश गाजरे यांची निवड झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.समाजातील गोरं गरीब , शेतकरी , कष्टकरी व आदिवासी बांधवांच्या प्रश्र्नांची सोडवणुक करण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असतात त्यामुळे पारनेर तालुक्यात त्यांना एक कार्यक्षम सरपंच म्हणुन ओळखले जाऊ लागले आहे.आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून विकासकामांना गती देण्यासाठी देखील ते सदैव प्रयत्नशील आहेत.त्यांच्या या कार्यतत्परतेबद्दल समाजातील विविध घटकांमधुन त्यांचे भरभरून कौतुक होतं आहे.

सरपंच प्रकाश गाजरे हे आपल्या म्हसोबा झाप या ग्रामपंचायतमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. शेतकरी योजनांची ते स्वतः जनजागृती करत असून त्यांचे सुरू असलेले हे कार्य निश्चित कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना राबवून म्हसोबा झाप ग्रामपंचायत मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर विविध उपक्रम राबवले आहेत. सरपंच प्रकाश गाजरे हे पारनेर तालुक्यात एक उपक्रमशील सरपंच म्हणून सध्या समोर येत आहेत.