Take a fresh look at your lifestyle.

अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित नसतील!

नानांचा जीवनपट एकदा जाणून घ्याच !

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर फिल्म इंडस्ट्रीत त्या अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांना लोकांकडून प्रचंड प्रेम आणि सन्मान मिळत आला आहे. करिअरच्या सुरुवातीला सावळा रंग असल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. मात्र त्यांच्या अभिनयामुळेच जनतेने त्यांना केवळ स्वीकारले नाही तर आपल्या हृदयात सुद्धा स्थान दिले. या अभिनेत्याच्या जन्मदिनी आम्ही तुम्हाला त्याच्या जीवनातील अशा अनेक बाजू सांगणार आहोत. ज्या तुम्हाला माहित नसतील…
● त्यांचा जन्म मुंबईत कुलाबा येथे 1 जानेवारी 1951 ला झाला होता.
● त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले आहे.
● आपले करियर अ‍ॅक्टिंगमध्ये सुरू करण्यापूर्वी झेब्रा क्रॉसिंग आणि पोस्टर सुद्धा पेंट केले आहेत.
● त्यांचे वडिल नानांना नाटक पाहण्यासाठी प्रेरित करत असत.
● नाटक पाहत असताना नानांचे मन त्यामध्ये रमले आणि त्यांनी चित्रपटांना आपले करियर म्हणून निवडले.
● नाना पाटेकर 28 वर्षांचे असताना हार्टअटॅकने त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
● आजसुद्धा नाना आपल्या आईसोबत 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहतात.
● 1978 मध्ये ‘गमन’ चित्रपटातून त्यांनी आपल्या करियरला सुरूवात केली होती.
● यानंतर गिद्द, अंकुश, प्रहार, प्रतिघात सारख्या चित्रपटांमधून नानांनी आपल्या अभिनयाद्वारे लोकांचे लक्ष वेधले मात्र, ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटाने त्यांना खरी लोकप्रियता दिली.
● पुढे प्रहार, दीक्षा, दिशा, राजू बन गया जंटलमन, तिरंगा, क्रांतीवीर, हमदोनो, खामोशी, गुलाम-ए-मुस्तफा, वजूद, कोहराम आणि हूतूतू सारखे चित्रपट करून त्यांनी नाव कमावले.
● बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर नाना पुन्हा एकदा चित्रपटात परतले आहेत. ते आता ‘तडका’ चित्रपटात दिसणार आहेत.