Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही कापडी मास्क घालताय का ?

मग एकदा ​​​​​​​तोटे वाचाच...! 

जगभरातील डॉक्टर म्हणतात की, फेस मास्क घालणे हा कोरोनापासून बचावाचा सर्वात प्रभावी उपाय आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गादरम्यान, तज्ज्ञांनी इशारा दिलाय की जर तुम्ही फक्त कापडी मास्क घातला तर कोरोनापासून बचाव करणे कठीण आहे. याच पार्श्वभूमीवर कापडी मास्कचे तोटे जाणून घेऊयात… 
● हा मास्क सूक्ष्म कणांना शरीरात जाण्यापासून संरक्षण देत नाही.
● अमेरिकन कॉन्फरन्स ऑफ गव्हर्नमेंटल इंडस्ट्रियल हायजिनिस्टच्या मते, या मास्कमध्ये 75% लीकेज असते.
● संशोधनात आढळून आहे की जाड कापडाचे मास्क देखील वैद्यकीय श्रेणीतील मुखवटे इतके चांगले काम करू शकत नाहीत.
● यूएस हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, N95 मास्क 95% आणि डिस्पोजेबल मास्क 85% पर्यंत संरक्षण देतात.
तज्ज्ञ नक्की काय म्हणतात? : वैद्यकीय विश्लेषक डॉ. लियाना वेन म्हणतात की, कापडी मास्क चेहऱ्यावरील सजावटीपेक्षा कोणत्याही उपयोगाचे नाही. विशेषतः ओमायक्रॉनच्या संसर्गामध्ये त्यांच्यासाठी जागा नाही. त्यामुळे लोकांनी तीन-लेयर सर्जिकल मास्क वापरला पाहिजे. हे बाजारात अगदी सहज उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही त्याच्यासोबत कापडी मास्क घालू शकता. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी N95 आणि K95 मास्क घालणे महत्वाचे आहे.
याकडेही लक्ष द्या : मास्क घालताना, तो कसा बसतो? हे लक्षात ठेवा. तुमच्या मास्कच्या कोणत्याही बाजूने लिकेज तर नाही ना. तुमचे नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकली आहे का? हे पाहा.
गेल्या काही दिवसांपासून जर्मनी आणि ऑस्ट्रियासारख्या देशांनी मास्क घालण्याचे प्रमाण बदलले आहे. आता तेथे सार्वजनिक ठिकाणी किमान सर्जिकल मास्क घालणे आवश्यक आहे.