Take a fresh look at your lifestyle.

युवकांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यावे :आमदार निलेश लंके.

सावता परिषदेच्या कार्यालयाचे निघोजला उद्घाटन.

 

 

निघोज :सामान्य माणसाला मदतीचा हात देण्यासाठी आज युवा शक्ती मोठ्या प्रमाणात आघाडीवर असून मला निवडणुकीत विजयी करण्यात युवकांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे आता पारनेरच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून द्यावे. असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी आहे.

निघोज येथील सावता परिषदेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. निघोज परिसर फलोद्यान संस्थेचे उपाध्यक्ष अमृता रसाळ,सावता परीषदेचे जिल्हा अध्यक्ष गणेश बनकर, उपाध्यक्ष सुभाष लोंढे, जिल्हा सरचिटणीस गुलाब गायकवाड,सावता परीषदेचे तालुका अध्यक्ष सुनिल गायकवाड, उपाध्यक्ष पॄथ्वीराज कोल्हे, दादाभाऊ रसाळ, प्रविण व्यवहारे, रवि पांढरकर, निलेश रसाळ, सनेश बोदगे, श्रीधर गाडीलकर, श्रीकांत देंडगे, दत्ता भुकन,किरण रसाळ, सौरभ रसाळ,आकाश शिंदे, अक्षय रसाळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले, की, स्वतः चा व्यवसाय सांभाळुन तालुक्यातील युवक कोरोनाच्या महामारीत सामान्य माणसाला मदतीचा हात देण्यासाठी रस्त्यावर आले. तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवुन तालुक्यातील जनतेला आधार दिला. युवकांचे हे कार्य आभिमानास्पद आहे. भविष्यातही युवकांनी सामाजिक उपक्रम हाती घ्यावे. असे आवाहनही आमदार निलेश लंके यांनी यावेळी केले.यावेळी रुपालीताई चाकणकर व आमदार निलेश लंके यांचा सावता परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.