सुप्यात उत्तराखंडच्या सोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा !
स्वस्तातील सोने खरेदी पडले भलतेच महागात.
सुपा : आपल्या मूळ गावाकडच्या ओळखीच्या असणाऱ्या एकजणाच्या स्वस्तात सोने देतो या अमिषाला भुलून उत्तराखंड येथील सोने व्यावसायिक थेट सुप्यात आला. त्याने सोने पाहिले सत्यताही पटली. पण नंतर घडले वेगळेच ! या व्यावसायिकाची स्वस्तातील सोन्याच्या आमिषापोटी लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.अखेर त्यांनी सुपा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत भुवनलाल वर्मा (रा.भनोली,जि.अलमोडा, उत्तराखंड राज्य )यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेली फिर्याद अशी की,मी वरील ठिकाणी पत्नी अन्सा .मुलगा नवीनलाल वर्मा असे एकत्र राहतो. मी राहत असलेल्या ठिकाणी माझे साई ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. माझे मुळ गावापासून एक किलोमीटर अंतरावर माझ्या ओळखीचे कृष्णा रमीराम चंद्रा वय ३५ व मोहनसिंग महासिंग बिस्ट असे राहाण्यास असून त्यांना मी ओळखतो. ते महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी सचिन हॉटेल या ठिकाणी वेटरचे काम करत होते. ते सदरचे काम सोडून सध्या आमचे मुळ गावी भनोली येथे आलेले आहेत.
सुमारे एक महिन्यापूर्वी माझ्या ओळखीचा व माझे मुळ गावाजवळ राहाणारे कृष्णा रमीराम चंद्रा व मोहनसिंग असे माझ्या दुकानावर आले. व मला म्हणाले की, आमचे ओळखीचा शिर्डी येथे हॉटेल सचिन येथे काम करणारा मंगेश हा आमचा मित्र असून त्याने आम्हांस सांगितले आहे की, माझ्या मित्राकडे तीन किलो सोने आहे. ते स्वस्तात विकायचे आहे. असे मला सांगितले. त्यानंतर माझे वरील ओळखीचे दोन्ही इसम आहेत. माझे दुकानावर वेळोवेळी येऊन मला सदरचे सोने तुम्ही स्वस्तात खरेदी करून घ्या असे सांगत. त्यामुळे मी त्यांचेवर विश्वास ठेवून मी व माझे गावातील वरील दोन्ही इसम असे रेल्वेने अहमदनगर येथे दि.०५/०९/२०२१ रोजी आलो. मंगेश ने बोलिविल्यामुळे तेथून बसने सुपा टोलनाक्याजवळील हॉटेल राजरतन येथे येऊन मुक्काम केला. त्या ठिकाणी मंगेश बरोबर चर्चा करून मंगेश याने खात्रीने आम्हांस सांगितले की, माझ्याकडे आत्ता सोने दाखविण्यास नाही. ते समोरच्या व्यक्तीकडे ठेवलेले असून सदरचे सोने घेण्यासाठी आपण उद्या दि.०६/०९/२०२१ रोजी जाऊ किंवा त्या व्यक्तीला येथे हॉटेल राजरतन येथे बालावून घेऊ असे सांगितले.
मंगेश हा आमचे समोर वेळोवेळी समोरच्या व्यक्तीला सोने विक्रीबाबत फोन करून आमचा विश्वास संपादन करीत होता. त्यानंतर सायंकाळी ५.०० वा. चे सुमारास मंगेश याने टोलनाक्याचे पुढे असणारे एका गावामध्ये आम्हाला घेऊन एका उंच, सडपातळ अशा इसमाकडे घेऊन गेला. त्या इसमाने मला अंदाजे एक पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व एक तीन ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का दाखविला. ते सोने खरे आहे किंवा कसे ? याची खात्री करण्यासाठी मंगेश याने आम्हाला दि.०७/०९/२०२१ रोजी माऊली ज्वेलर्स सुपा या सोनाराच्या दुकानात घेऊन गेला. त्यावेळी सदरचे सोने हे आम्ही सोनाराकडून पडताळणी करून पाहिले असता ते खरे होते. त्यामुळे सदरचे सोने हे खरे असल्याबाबत आमचा विश्वास बसला त्यावेळी मी त्यांचे बरोबर आर्धा किलो सोने १५,००,०००/- रू. (पंधरा लाख रुपये) मध्ये सोने खरेदी करण्याचे आमचे ठरल्याने समोरील व्यक्ती याने मला पैसे घेऊन या असे सांगितले. त्यावेळी मी त्या इसमास सांगितले की, माझ्याकडे सध्या एवढे पैसे नाहीत.
मी माझे गावी जाऊन पैसे घेऊन येतो असे सांगून मी शिर्डी येथे हॉटेलमध्ये थांबलो, तेथे माझे कुटुंबियांना गावाकडून बोलावून घेतले. तेथे मुक्काम करून तेथील स्टेट बँकेच्या ए.टी.एम. मधून मी वेळोवेळी पैसे काढले व माझ्याकडे १२,००,०००/- रूपये (बारा लाख रूपये ) जमा झाल्याने मी व माझे गावचे जोडीदार अशांनी सुपा येथे दि. १४/०९/२०२१ रोजी जाऊन मंगेश व समोरील इसम (पार्टी) यांना सदरचे पैसे देऊन सोने खरेदी करण्याचे ठरले व बाकी पैसे आमचे मुळगावी भनोली येथे पार्टीला सोबत घेऊन जाऊन तेथे देण्याचे ठरले. त्यानुसार आज दि. १४/०९/२०२१ रोजी मी व माझे सोबत असणारे कृष्णाचंद्रा व मोहनसिंग माझा मुलगा नवीनलाल वर्मा असे आम्ही सर्वजन सुपा येथे आलो. तेथे दुपारी १.३० वा.चे सुमारास मंगेश हा आम्हाला सुपा चौकात भेटला. व आम्हाला म्हणाला की, पैसे आणले आहेत का. त्यावेळेस मी त्यास हो म्हणालो असता, त्याने पहिला मला व नंतर माझ्या मुलाला असे मोटार सायकलवरून सुपा पासून अंदाजे दोन कि.मी. अंतरावर पवारवाडी घाटात थांबविले. त्या ठिकाणी एक वयस्कर इसम ज्याला मी फोटो पाहून ओळखू शकतो, अशा व्यक्तीची भेट घालून दिली. तेथे त्या वयस्कर व्यक्तीने सोने खरेदीसाठी पैसे घेऊन आले आहेत का ? असे विचारून मी त्यास हो म्हणाल्यानंतर त्याने त्याचे सोबत मी, मुलगा व मंगेश असे घाटाच्या नगर दिशेने डाव्या बाजुने जंगलात पायी चालत गेलो. या दरम्यान माझे सोबत शिर्डीवरून आलेले दोन इसम हे सुपा बस स्टैंडजवळ चौकात थांबलेले होते. आम्ही दुपारी २.०० वा. चे सुमारास रोडलगत असलेल्या जंगलात पायी चालत गेलो. त्या ठिकाणी
आम्हाला आतमध्ये गेल्यानंतर आमच्या सोबत असणा-या वयस्कर माणसाने पिवळ्या धातुच्या काही अंगठ्या व शिक्के सुमारे अर्धा किलो वजनाचे दाखविले. त्यानंतर मी त्यांना माझ्याकडे असलेली पिशवीतील पैसे खोलून दाखविली. त्यावेळी सोने देणारा इसम हा जोरात ओरडून यारे असे म्हणाला असता अचानक त्या ठिकाणी झाडीत लपलेले सात ते आठ इसमांनी अचानक येऊन मला व माझा मुलगा नवीनलाल यास डोक्यात काठीने मारहाण करून जखमी केले. आणि माझ्या हातातील प्लास्टिक पिशवीमध्ये असलेले १२,००,००० / रूपये (बारा लाख रुपये) माझे आधारकार्ड मुलाचे आधार कार्ड मुलाचे गाडीचे लायसन्स मुलाचा मोबाईल स्टेट बँकेचे दोन चेक बुक, व दोन ए.टी.एम. कार्ड असे आमचा विश्वास घात करून मला व माझ्या मुलास काठीने मारहाण करून बळजबरीने चोरून घेऊन गेले आहेत. माझे चोरीस गेलेल्या रक्कमेचे वर्णन खालील प्रमाणे
१) १,२०,०००/- रू. रोख रक्कम त्यात २००० रू.दराच्या ६० नोटा नंबर माहित नाहीत.
२) १०,००,०००/- रू. रोख रक्कम त्यात ५००रू. दराच्या २००० नोटा नंबर माहित नाहीत.
३) ८०,०००/- रू. रोख रक्कम त्यात २०० रू.दराच्या ४०० नोटा नंबर माहित नाहीत.
४) ०००/- रू. किं.चे त्यात आधारकार्ड मुचलाचे आधार कार्ड, मुलाचे गाडीचे लायसन्स,दोन चेक बुक व दोन ए.टी.एम. कार्ड किं. अं.स्टेट बँकेचे
(५) २,०००/- रू. किं.चा एम. आय. टु कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्यामध्ये आयडिया कंपनीचे सिमकार्ड नंबर ७०५५१३९०६१ असलेले जु.वा.किं.अं.
६) २,०००/- रू. किं. चा लावा कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्यामध्ये होडाफोन सिमकार्ड नंबर_७८३०८०२५०१ असलेले जु.वा. किं. अं.१२,०४,०००/- रूपये
वरील वर्णनाची रोख रक्कम व आधारकार्ड, गाडीचे लायसन्स, मोबाईल हॅन्डसेट, स्टेट बँकेचे दोन चेक बुक, व दोन ए.टी.एम. कार्ड असे माझा विश्वास संपादन करून मंगेश व सोने देणारा इसम तसेच इतर सात ते आठ अनोळखी इसमांनी कट रचुन मला व माझे मुलास काठीने मारहाण करून जखमी केले. व माझ्या हातातील पिशवी बळजबरीने हिसकावून त्यामध्ये असलेल्या रक्कमेसह चोरून नेले आहे. आमचे सोबत सोन्याचा व्यवहार करणारा मंगेश याचे वय अंदाजे २२ वर्षाचे असून त्याने जांभळे रंगाची जिन्स पॅन्ट व नारंगी रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट घातलेला होता. सोने देणारा इसम हा अंदाजे ५० ते ५५ वयाचा असून अंगाने सडपातळ, उंच रंगाने काळा त्याने अंगात काळी पॅन्ट व पांढरा फुल बाह्यांचा शर्ट घातलेला होता. त्या दोन ही इसमां बरोबर यापुर्वी मी भेटुन बोललेलो असून त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो.
तरी दि. १४/०९/२०२१ रोजी दुपारी २.०० वा. चे सुमारास पवारवाडी घाटातील जंगलात पुणे ते नगर जाणारे रोडलगत मंगेश व मला सोने देणारा इसम यांनी माझा विश्वास संपादन करून, कट रचुन वरील सर्व आरोपींनी मला व माझ्या मुलास काठीने मारहाण करुन जखमी केले व माझ्या हातातील पिशवीमध्ये ठेवलेली १२,००,००० /- रूपये (बारा लाख रुपये रोख) रोख रक्कम मोबाईल हॅन्डसेट आधारकार्ड गाडीचे लायसन्स, मोबाईल हॅन्डसेट, स्टेट बँकेचे दोन चेक बुक, व दोन ए.टी.एम. कार्ड असे त्यांच्या आर्थिक फायद्याकरीता धोका देऊन, कट रचून, बळजबरीने चोरून नेले आहेत. त्यांचे मारहाणीत मी व माझा मुलगा जखमी झालेलो आहोत. घटनेबाबत आम्ही पोलीस स्टेशनला येऊन वरील लोकांविरूध्द कायदेशीर फिर्याद देत आहे.