Take a fresh look at your lifestyle.

नव्या वर्षात केलेले संकल्प का मोडीत निघतात? 

एकदा आवश्य वाचाच ! 

नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनीच नव्या वर्षात काय करायचं? याचे संकल्प सुरु केले असतील. नवं वर्ष जवळ आलं, की संकल्प करायचे ही जणू एक फॅशनच बनली आहे. मात्र ते संकल्प किती प्रमाणात पूर्ण केले जातात? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. संकल्प सिद्धीला का जात नाहीत? याची कारणं आज जाणून घेऊयात… 
1. संकल्पांमध्ये नेमकेपणाचा (Focus) अभाव असतो. सकाळी 6 वाजता असं नेमकं उद्दिष्ट ठरवण्याऐवजी लवकर उठण्याची सवय लावू असा संकल्प केला जातो.
2. बाहेरच्या कोणत्या कारणामुळे संकल्प मोडला, तर ते कशा रूपाने भरून काढायचं हेदेखील संकल्पामध्ये ठरवून ठेवलेलं असणं आवश्यक आहे.
3. अनेक जण सकारात्मक संकल्प करत नाहीत. त्यामुळे देखील संकल्पपूर्तीत अडथळा येतो. अनेक जण काय करायचं आहे? याऐवजी काय करायचं नाही? हे ठरवतात.
4. अनेक जणांच्या संकल्पांमध्ये म्हणजे निर्णयात दृढता नसते. त्यात आत्मविश्वासाचा अभाव असतो. आपण ती गोष्ट पूर्ण करू शकू की नाही, याबद्दल स्वतःच्याच मनात शंका असते.
वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन नवे संकल्प करायला हवेत आणि त्यांची अंमलबजावणीदेखील दृढपणे करायला हवी.