Take a fresh look at your lifestyle.

पीएफ नक्की कधी काढता येतो?

जाणून घ्या नियम व अटी!

नोकरदार वर्गाला अडचणीच्या काळात पीएफची रक्कम कामी येते. मात्र ही रक्कम काढताना काही नियम आणि अटी आहेत. मुख्य अट म्हणजे तुम्ही किमान दोन महिने बेरोजगार असणे आवश्यक आहे. अशाच काही अटींबाबत आज जाणून घेऊयात… 

▪️लग्न : तुम्हाला किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या लग्नासाठी पैसे काढायचे असतील, तर तुम्ही पीएफ खात्यातून रक्कम काढू शकता. तुमच्या जमा रकमेच्या 50 टक्के रक्कम ही तुम्हाला लग्नासाठी मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्ही कमीत-कमी 7 वर्ष तुमचा पीएफ कट होणे आवश्यक आहे.

▪️मुलांचे शिक्षण : मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही पीएफ मध्ये जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत रक्कम मिळू शकते. मात्र यासाठी देखील तुम्ही 7 वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरीमध्ये असणे आवश्यक आहे.
▪️घर खरेदी : यासाठी देखील तुम्ही तुमच्या पीए खात्यामधून पैसे काढू शकता. यासाठी तुम्ही जमा केलेल्या रकमेमधील 50 टक्क्यांपर्यंत रक्कम मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्ही सलग 5 वर्ष नोकरी करणे आवश्यक आहे.
▪️मेडिकल अ‍ॅडव्हान्स : कोरोना संकटाच्या वेळी सरकारने गरजूंना तातडीने पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली. याअंतर्गत तुम्ही ईपीएफ खात्यातून महिने (मूलभूत वेतन + डीए) किंवा एकूण रकमेच्या 75 टक्के रक्कम पीएफ शिल्लक म्हणून काढू शकता. ईपीएफओने 1 जून 2021 रोजी एक परिपत्रक जारी करत नमूद केले होते की, मेडिकल अ‍ॅडव्हान्स म्हणून 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येतील. यामध्ये काही बदल होऊ शकतात.