वर्क फ्रॉम होम बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल…!
हर्ष गोयंकांना महिलेची विनंती; वाचून येईल हसू
कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम कामाचा एका अविभाज्य भाग बनला होता. मात्र यामुळे काही महिलांना किती वैताग आला आहे? याचे एका उदाहरण समोर आले आहे.
सविस्तर असे कि, RPG ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका यांच्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीनं गोयंकांना एक विनंती केलीय. त्यात तिने म्हटलं आहे कि, वर्क फ्रॉम होम बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल. तिची विनंती पाहून गोयंकांनाही नक्की उत्तर काय द्यावं? हाच प्रश्न पडला.
महिलेनी काय विनंती केली? :
● वर्क फ्रॉम होम बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल.
● माझा नवरा दिवसातून दहा वेळा कॉफी पितो”. घरून काम करत असताना, वेग-वेगळ्याखोल्यांमध्ये जाऊन काम करतो आणि आम्हाला गोंधळात टाकतो.
● एवढंच काय, तो ‘सतत जेवण मागतो’आणि मी त्याला ऑफिसच्या कॉल दरम्यान झोपलेलं देखील पाहिलं आहे.
● इतकंच नाही तर “मला आधीच दोन मुलं आहेत ज्यांची काळजी मलाच घ्यावी लागते.
त्यामुळे मी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करते.
या महिलेचा मेसेज गोयंकांनी ट्विट केला आणि “आता मी यावर काय उत्तर द्यावं” असं पोस्ट केलं. सध्या या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.