Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸29 डिसेंबर 2021

▪️मेष : काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे.
▪️वृषभ : वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.
▪️मिथुन : नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल.

▪️कर्क : भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.
▪️सिंह : मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल.
▪️कन्या : व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका.

▪️तूळ : कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते.
▪️वृश्चिक : पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. जुनी उधारी वसूल होईल.
▪️धनू : बोलताना तारतम्य बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील.

▪️मकर : प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील. दानधर्म कराल. घरात अनावश्यक खर्च निघेल.
▪️कुंभ : धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल.
▪️मीन : धर्म-कार्यात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.