Take a fresh look at your lifestyle.

लोकरीच्या कपड्यांची कशी काळजी घ्यायची ?

माहितीसाठी एकदा वाचाच!

लोकरी कपडेही धुण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची पद्धत इतर कपड्यांसारखी नसते. कारण थंडीच्या मोसामाखेरीज हे कपडे वापरले जात नाहीत. त्यामुळे या कपड्यांची काळजी व्यवस्थित घेतली गेली पाहिजे. आज त्याबाबत जाणून घेऊयात…
● लोकरीचे कपडे नाजूक असल्याने ते धुताना, वाळविताना आणि उपयोगात नसताना ते कपाटामध्ये व्यवस्थित ठेवले जातील याची काळजी घ्या.

● अनेक लोक लोकरीचे कपडे ड्राय क्लीन करणे पसंत करतात. यामध्ये भरमसाट पैसेही खर्च होतात. मात्र हे कपडे काळजीपूर्वक घरीच धुतले तर पैशांची बचत होईल.
● लोकरी कपड्यांच्या लेबलवर बहुतेकवेळी हे कपडे कसे धुतले जावेत? यासंबंधी सूचना असतात. त्याचे पालन करायला हवे. तरच हे कपडे अधिक काळ टिकतील.
● लोकरीचा कपडा घरी धुण्यापूर्वी तो कुठून उसविला गेला नाही ना? याची खात्री करून घ्या. जर कपडा उसविला तर तो तिथे दुरुस्त करून घेऊन मगच धुवा.
● हल्ली वॉशिंग मशीन्समध्ये लोकरीचे कपडे धुण्याकरिता वेगळी ‘सायकल’ असते. यादरम्यान लोकरीचे कपडे मशीनमध्ये हळुवार धुतले जाऊन जास्त पिळलेही जात नाहीत.
● खास ‘वॉश सायकल’ आपल्या वॉशिंग मशीनमध्ये नसेल तर लोकरीचे कपडे त्यामध्ये धुणे टाळा. कारण अशा वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुतल्याने त्यांचा आकार बिघडू शकतो, चमक नाहीशी होऊ शकते, रंग फिका पडू शकतो.
● लोकरीचे कपडे धुताना शक्यतो हातानेच धुवा. गडद रंगांचे कपडे हलक्या रंगांच्या कपड्यांच्या सोबत भिजवू नका. तसेच हे कपडे धुण्यासाठी बाजारामध्ये खास लिक्विड मिळते त्याचा वापर करा.
● हे कपडे धुण्याआधी केवळ 5 ते 10 मिनिटे भिजवा. मात्र याण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. कारण या पाण्यामुळे कपड्याचा रंग फिकट होऊ शकतो.
● लोकरीचे कपडे नाजूक असल्याने लगेच स्वच्छ होणारे असतात, त्यामुळे हे कपडे घासून धुण्याची आवश्यकता नाही.
● थंड पाण्यामध्ये लिक्विड सोप मिसळून यामध्ये काही मिनिटे कपडे भिजविल्यानेही हे कपडे स्वच्छ होतात. हे कपडे धुण्यासाठी सामान्य डीटर्जंट वापर करू नका.
● कपडे धुवून झाल्यानंतर हे कपडे तारेवर किंवा स्टँडवर वाळत न घालता एखाद्या टेबलावर पसरवून वाळू द्या. त्यामुळे या कपड्यांचा आकार बिघडण्याची शक्यता टळेल. कडक उन्हामध्ये हे कपडे वाळविणे टाळा.
● हे कपडे व्यवस्थित वाळल्यानंतरच त्यांच्या घड्या करा. या कपड्यांना इस्त्री करायची झाल्यास इस्त्रीवरील खास लोकरीच्या कपड्यांसाठी असलेल्या सेटिंगवरच इस्त्री करा.
● हे कपडे वापरात नसताना कपाटामध्ये एखाद्या साडी कव्हरमध्ये घालून, त्यामध्ये डांबराच्या गोळ्या घालून ठेवा. अधून-मधून या कपड्यांना काही मिनिटे ऊन दाखविल्याने दुर्गंधी येणार नाही.