Take a fresh look at your lifestyle.

कृष्ण प्रकाश साहेबांनी थेट झाडाचा ओंडकाच आरोपींच्या छातीत टाकला.. !

ओंडक्याच्या ओझ्याने तीनही आरोपी खाली पडले.

पुणे : अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या गुन्हेगारांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी धाडस दाखवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कृष्ण प्रकाश यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपींना जिवंत पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दरम्यान, कुख्यात गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलीसांवर गुन्हेगारांनी गोळीबार केल्याची घटना देखील घडली या घटनेदरम्यान पोलिसांनीदेखील क्रॉस फायरिंग करत गुन्हेगारांच्या दिशेने दोन राउंड फायर केले.
▪️अशी घडली ही थरारक घटना !
पोलीस आरोपींना पकडण्यासाठी पुढे गेले असता आरोपींनी त्यांच्याकडील पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तर देत पोलिसांनी देखील दोन राउंड फायर केले आणि सगळे आपल्या पोजिशनवर गेले. यावेळी आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळू लागले. त्याचवेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश त्यांच्यासमोर आडवे आले. त्यांनी बाजूला पडलेल्या एका मोठ्या झाडाचा ओंडका पळणाऱ्या आरोपींच्या छातीवर टाकला. झाडाच्या ओझ्याने तीनही आरोपी खाली पडले आणि वेळेचं भान राखत मोहिमेत सहभागी असलेल्या इतर पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आरोपींना जेरबंद केले. या दरम्यान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि गुन्हेगारांमध्ये मोठी झटापट झाली आणि त्यात प्रकाश हे किरकोळ जखमी झाले आहेत.
गुन्हेगारांनी १८ डिसेंबरला पिंपळेगुरवमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार केला होता, यात योगेश जगतापची हत्या झाली होती. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले होते. मात्र,आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वात अँटी गुंडा स्कॉड आणि सांगवी पोलीस गोळीबारातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा रचला होता.मात्र पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून देखील सुटण्यासाठी तिन्ही आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला, मग प्रत्युत्तरात पोलिसांना देखील गोळीबार करावा लागला. या चकमकीत पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक देखील केले जात आहे.