Take a fresh look at your lifestyle.

गर्लफ्रेंड मिळण्यासाठी आमदारांना पत्र लिहिणारा ‘तो’ पठ्ठया सापडला !

'असा' झाला धक्कादायक खुलासा.

 

 

 

चंद्रपूर : लोक आपले काम मार्गी लावण्यासाठी, अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना पत्र लिहिलात. मात्र एका पठ्ठ्याने चक्क गर्लफ्रेंड मिळावी यासाठी थेट आमदार महोदयांना पत्र लिहिल्याचा एक प्रकार चंद्रपूरच्या राजुरामध्ये समोर आला होता. ते कथित पत्र लिहिणारा युवक अखेर सापडला आहे. पत्राखाली नाव असलेल्या भूषणच्या मित्रांनी सर्व कारभार केल्याचा धक्कादायक खुलासा आता झालाय. भूषणला याबाबत कल्पनाही नसल्याचे उघड झाले आहे!

राजुरा तालुक्यातील चंदनवाही येथील भूषणच्या मित्रांनी त्याच्या नावाने गंमतीने लिहून हे पत्र व्हायरल केले होतं. आमदार सुभाष धोटे आपल्याला वडीलधारे असून त्यांना त्रास देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे भूषण आणि मित्रांनी स्पष्ट केलं आहे. या कृतीविषयी सर्वांना पश्चाताप असल्याचे सांगत त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यकर्त्यानी या युवकाला शोधून काढल्यावर आमदार धोटे यांनी गावाला भेट देत ग्रामस्थ आणि त्या युवकांशी संवाद साधला.

▪️पत्रात नेमकं काय लिहिलं होतं ?

प्रती आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा

विषय – गर्लफ्रेण्ड न पटण्या बाबत

अर्जदार – भूषण जांबुवंत राठोड

महोदय,

सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज पेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा

आपला प्रेमी

भूषण जांबुवंत राठोड

▪️आमदारांना ‘ते’ पत्र मिळाले नाही.

दुसरीकडे आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला असून क्षेत्रातील कार्यकर्त्यांना हा युवक शोधण्यास सांगितल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो सापडलाच तर त्याची समस्या विचारपूस करून दूर करता येईल मात्र अशा पद्धतीने पत्रप्रपंच योग्य नव्हे असेही त्यांनी म्हटले आहे.

▪️तरुणांकडून आमदार महोदयांसमोर दिलगिरी व्यक्त.

सोशल मीडियावर हे पत्र चांगलंच व्हायरल होत आहे. या पत्राची दखल घेत आमदार सुभाष धोटे यांनी यांनी गावाला भेट देत ग्रामस्थ आणि त्या युवकांशी संवाद साधला. भूषणच्या मित्रांनी त्याच्या नावाने गंमतीने लिहून हे पत्र व्हायरल केले होते. आमदार सुभाष धोटे आपल्याला वडीलधारे असून त्यांना त्रास देण्याचा कुठलाही विचार नसल्याचं भूषण आणि मित्रांनी स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.