Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून उभे राहून जेवण करु नका! 

जाणून घ्या,काय आहे कारण ?

 

आपल्या भारतीय संस्कृतीत जमीनीवर बसूनच जेवण करण्याची परंपरा आहे. मात्र काळ बदलत चालल्याने लोक टेबल-खुर्चीवर बसून जेवायला लागले आहेत. आता तर लोकांमध्ये उभे राहून जेवणाचे फॅडच आले आहे.
विविध कार्यक्रमात हमखास बुफे डिनर किंवा बुफे लंचला पसंती दिली जाते. फार कमी ठिकाणी बैठक लावून जेवण दिले जाते. मात्र उभे राहून जेवल्याने आपल्या शरीराचे किती नुकसान होते? याबद्दल अनेकजणांना माहित नसते. चला, आज आम्ही तुम्हाला उभे राहून जेवल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल सांगणार आहोत…
● अपचन, लठ्ठपणा असे आजार उद्भवतात.

● आपल्या शरीरातील आतडे आकसल्या जातात आणि त्यामुळे खाल्लेले पचायला त्रास होतो.
● उभे राहून जेवताना पायात बूट किंवा चप्पल असल्याने आपले पाय गरम पडतात. आयुर्वेदानुसार जेवताना आपले पाय थंड असणे महत्त्वाचे आहे.
● उभे राहून जेवण घेताना एकदाच काय ते जास्त ताटात वाढून घेतले जाते. यामुळे अनेकदा आपण जास्त खातो आणि त्यामुळे अ‍ॅसिडिटी आणि लठ्ठपणासारखे त्रास होतात.

● बसून जेवल्याने मन शांत आणि एकाग्र राहते. मात्र उभे राहून जेवल्याने ती एकाग्रता राहत नाही.
● उभे राहून जेवताना खूप घाईत जेवल्याने सका लागणे किंवा नाकात घास जाण्यासारखे प्रकार होतात.
● उभे राहून खाल्याने शरीराला योग्य ते पोषक घटकही मिळत नाही. त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही जमिनीवर बसून जेवाल.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे.