Take a fresh look at your lifestyle.

… तर ते साधन फलप्राप्तीपर्यंत नेणार नाही !

प्रक्रिया माहिती असल्याशिवाय क्रिया सिद्धतेला जात नाही.

आपण वरवरच्या रंगाला भुलुन अनेकदा फसतो.हल्ली जाहिरातीचे युग आहे असं म्हणतात, आपल्या मालाची जाहिरात करायची आणि ग्राहक मिळवायचा हे आपण नित्य पहातो.जाहिरात पाहुन खरेदी केलेली वस्तु प्रत्यक्षात तसं काम करीत नाही असा अनुभव आला की आपण फसलो गेलो आहोत याची जाणीव होते.
देव दाखवण्याचीही अशीच जाहिरात चालु आहे. पण प्रत्यक्ष अनुभुती नाही. जे अनुभुती देऊ शकत नाही,देवाला सिद्ध करु शकत नाही.ते शास्र;शास्र नसुन दुकानदारी आहे.आणि ते सांगणारा दुकानदारच आहे.संत साहित्यच देव दाखवण्याची प्रक्रिया आहे. पण त्यातील गुढार्थ कळणे अशक्यप्राय गोष्ट आहे.त्यासाठी गुरु नावाचा वाटाड्या असला तरच आणि तरच देव अनुभवता येतो.त्यासाठी कुठेही भटकायची गरज नाही.
मुद्रा,आसणं,योगा,होमहवन करण्याची आवश्यकता नाही. आम्ही मेडिकलमधुन औषधे खरेदी केली तर त्यात कोणती जीवनसत्त्वे किती प्रमाणात आहे हे आम्ही आता वाचायला शिकलो.त्यामुळे ती औषधे पोटात गेल्यावर आजार बरा होणार याची खात्री होते.तसं ज्या देवाला आम्ही भजतो तो भेटेल का? खरं तर हा प्रश्न पडत नाही म्हणूनच भेट होत नाही.कितीही ग्रंथ वाचले,पाठ केले तरी देवाचं दर्शन होऊ शकत नाही.ग्रंथ देवाचं दर्शन कसं होईल हे सांगणारी प्रक्रिया आहे.पठणाने तात्विक आनंद मिळेल पण देवाचं दर्शन होणार नाही.कारण त्यातील ओव्या, अभंग,ऋचा यांचा गुडार्थ कळण्यासाठी लागणारी ज्ञेय बुद्धी आमच्याकडे नाहीच.ते जाणणारा आणि सांगणारा गुरु मिळाला की दर्शन निश्चित झाले म्हणून समजा.
माऊली हरिपाठात म्हणतात,
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥
चार वेद ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद सहा शास्र न्याय, वैशेषिक, सांख्य,योग,पुर्वमिमांसा आणि उत्तरमिमांसा मग उपनिषदे, अठरा पुराणं,उपपुराणं या सर्व रचना या जगताचं कारण ईश्वर आहे हे सांगतात.असा साक्षीभुत ईश्वर जाणण्यासाठी आपण नेमका मार्ग कोणता पकडावा? हे उद्याच्या भागात पाहु.
रामकृष्णहरी