Take a fresh look at your lifestyle.

पारनेरात ‘कृषीगंगा’ प्रदर्शनाचा झाला समारोप!

चार दिवसात मिळाला मोठा प्रतिसाद !

पारनेर : आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तसेच निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य राज्यस्तरीय कृषीगंगा प्रदर्शनाचा आज समारोप झाला असून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चार दिवसात शेतकरी, विविध पक्षाचे अनेक पदाधिकारी, नेते मंडळी, पारनेर नगर स्थानिक ग्रामस्थांनी मिळुन सुमारे लाखभरांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
कोरोना तसेच ओमियोक्रॉनचे संकट आणि प्रशासनाने लावलेल्या निर्बंधाचा फटका प्रदर्शनालाही बसला तरीही जवळपास साडेतीन कोटी हून अधिक उलाढाल झाली असल्याचा अंदाज व्यवस्थापक बंडू पाचपुते गणेश जठार यांनी ‘पारनेर दर्शन’शी बोलताना व्यक्त केला.
कृषी प्रदर्शन विविध नाविन्यपूर्ण अनोख्या उपक्रमाने संपन्न झाले.या प्रदर्शनात आणि युवा उद्योजक बेरोजगार तरूण यांनी स्वयंरोजगार निवडत या स्टॉल मध्ये आपल्या व्यवसायाची उत्कृष्ट अशी जाहिरात व मालाची विक्री या प्रदर्शनाच्या माध्यमातून होते आहे .असे अनेक तरुण उद्योजकांनी सांगितले,कृषी गंगा राज्यस्तरीय प्रदर्शनाचे व्यवस्थापक म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील युवक बंडू पाचपुते व गणेश जठार यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन करून किमान राज्यभरातून 100 हुन अधिक व्यापारी आपल्या व्यवसायात वृद्धी करण्यासाठी पारनेर शहरांमध्ये आणले होते. त्यांची दुकानाची सुरक्षेची सर्व सुविधा देण्याची व्यवस्था चोख बजावली होती.
या व्यावसायिकांच्या स्टॉलमध्ये कृषिविषयक नवीन तंत्रज्ञान कृषीचे नवीन अवजारे विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स,वायु प्रदूषण कमी करण्यासाठी ई बाईक,बॅटरी पंप, पशुखाद्य,ठिबक सिंचन,सुधारित जैविक रासायनिक खते,औषधे,सेंद्रिय व रासायनिक खते, ऑटो स्टार्टर, महिलांसाठी गृह उपयोगी वस्तू ,सोलर तंत्रज्ञान ,दूध काढण्याची मशीन, कुकूटपालन, पतपुरवठा संस्था, महिला बचत गट, शासकीय योजनांची माहिती ,खाऊ गल्ली, विद्यार्थी बालकांसाठी विविध प्रकारचे खेळण्याचे उपकरणे ,साहित्य, पाळणे या सुख-सुविधा पूर्वक आमदार लंके यांच्या प्रयत्नातून व निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयोजना खाली राज्यस्तरीय प्रदर्शन सोहळ्याचा आज समारोप झाला.

कोल्हापूर,सांगली,या सह  राज्यभरातून आलेल्या सर्व व्यावसायिकांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला प्रदर्शन पाहण्यासाठी नगरसह पुणे, नाशिक, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली. या सर्व शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांच्याशी आमदार निलेश लंके यांनी संवाद साधला.
खवैय्यांनी शाकाहारी ,मांसाहरी पदार्थांवर ताव मारला. वडापाव, कच्छी दाबेली,पाणीपुरी,थालीपीठ, दावणगिरी डोसा, कोल्हापूरचा ज्यूस, पुणेरी पावभाजी, स्पेशल बिर्याणी आदी.पदार्थांचा आस्वाद घेतला.
या प्रदर्शनात दिड टन वजनाचा ‘गजेंद्र’ नावाचा रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. या रेड्याला पाहण्यासाठी गर्दी लोटली होती.