Take a fresh look at your lifestyle.

शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाच्या विविध निवडी जाहीर !

खामकर,फंड व ठाणगे यांची विविध पदावर वर्णी.

पारनेर: तालुका प्राथमिक शिक्षक परिषद व रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाच्या भाळवणी येथे झालेल्या सहविचार सभेत संतोष खामकर यांची शिक्षक परिषदेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड घोषित करण्यात आली. तसेच संदिप फंड यांची युवा परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी तर बाळासाहेब ठाणगे यांची पारनेर तालुका गुरुमाऊली मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली.
शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे व गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी नवीन निवडींची घोषणा केली.
सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक सुभाष रोहोकले हे उपस्थित होते. या सभेमध्ये शिक्षकांच्या विविध प्रलंबित विषयांवर चर्चा झाली. जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींच्या सेवेत सदैव तत्पर असणारे संघटन म्हणुन समाज आपल्याकडे पाहतो, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे व गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक परिषदेच्या कार्यकारीणीचा विस्तार करण्यात आला.
शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविणदादा ठुबे यांनी संतोष खामकर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हाशाखा अहमदनगरच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी, संदिप फंड यांची युवा परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी, बाळासाहेब ठाणगे यांची पारनेर तालुका गुरुमाऊली मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड घोषित करून नियुक्तीपत्र देवून सन्मानित केले.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक सुभाष रोहोकले, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे, नवनिर्वाचित जिल्हा संपर्कप्रमुख संतोष खामकर, युवा परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप फंड, पारनेर तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सुनिल दुधाडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या सहविचार सभेचे प्रास्ताविक शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष संदिप सुंबे यांनी केले. गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब धरम यांनी आभार मानले.
या कार्यक्रम प्रसंगी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे गुरुजी, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष खामकर सर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब रोहोकले सर, शिक्षक परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी सुहाग साबळे, विकास मंडळाचे सचिव मच्छिंद्र कोल्हे, पारनेर तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सुनिल दुधाडे,नगर तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष संजय दळवी, पारनेर तालुका शिक्षक परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष संदिप झावरे, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष संदिप सुंबे, सरचिटणीस शिवाजी कोरडे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब धरम, नगर तालुका गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाबळे, पारनेर तालुका गुरुमाऊलीचे सरचिटणीस अशोक गाडगे, युवा परिषदेचे अध्यक्ष विनायक ठुबे, सुभाष रोहोकले, शिवाजी ठुबे, संतोष चेमटे, भाऊसाहेब भांड, किसन दुधाडे, बापू चेमटे व शिक्षक परिषदेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.