Take a fresh look at your lifestyle.

हिवरे बाजारच्या सेवा सोसायटीच्या बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम !

सर्वच्या सर्व जागा बिनविरोध.

नगर – आदर्श गाव हिवरे बाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. सेवा सहकारी संस्थेच्या स्थापनेपासून निवडणूक बिनविरोध होत आहे.
संस्थेवर १३ संचालक मंडळ असून फक्त १३ फॉर्म प्राप्त झाल्यामुळे निवडूक बिनविरोध घोषित करण्यात आली.
संचालक मंडळात खुल्या प्रवर्गातून रामभाऊ कृष्णा चत्तर, छबू ज्ञानदेव ठाणगे, मारुती माधव ठाणगे, अशोक रतन गोह्ड, बबन अमृता पवार, संजय मारुती ठाणगे, धर्मराज भीमराज ठाणगे, गोपीनाथ नामदेव ठाणगे, महिला प्रवर्गातून संजना सरुदास पादीर, चंद्रकला बन्शी ठाणगे, अनुसूचित जाती प्रवर्गातून साहेबराव विठोबा कदम इतर मागास प्रवर्गातून दत्तात्रय सीताराम भालेकर, विशेष मागास प्रवर्गातून विठ्ठल भाऊ चव्हाण यांची निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अल्ताफ शेख व सचिव कुशाभाऊ ठाणगे सहकारी सोसायटी यांनी काम पाहिले.
आदर्शगाव हिवरे बाजाराची विविध कार्यकारी सेवा सोसायटी सभासद व बँक पातळीवर दरवर्षी ३१ मार्चपूर्वी १०० टक्के वसुली होते. सभासदांना १० टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येते.