Take a fresh look at your lifestyle.

पती-पत्नीसाठी आहे ‘ही’ जबरदस्त योजना !

दर महिन्याला मिळणार 10 हजार रुपये !

 

 

 

नवी दिल्ली : निवृत्तीचा काळ सुखकर करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे हे कधीही फायदेशीरच ठरते. यासाठी सरकारने अटल पेन्शन योजना हा चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या योजनेत पती आणि पत्नी वेगवेगळे खाते उघडून दरमहिना 10000 रुपये पेन्शन मिळवू शकतात.

अटल पेन्शन योजना ही 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यावेळी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु आता या योजनेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत 60 वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते.

अटल पेन्शन योजना ही सरकारी योजना आहे, ज्यात तुमच्याद्वारे गुंतवणूक केली जाणारी रक्कम तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि अधिकतर 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळते. ही एक सुरक्षित गुंतवणूक असून यात रजिस्ट्रेशन करण्यासाठी सेव्हिंग अकाउंट, आधार नंबर आणि एक मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.

▪️’असे’ आहेत योजनेचे फायदे 

या योजनेअंतर्गत 18 ते 40 वयोगटातील लोक अटल पेन्शन योजनेत आपलं नॉमिनेशन करू शकतात. त्यासाठी अर्जदाराकडे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीने 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजना सुरू केल्यास, त्याला 60 वर्षानंतर दर महिन्याला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. यासाठी दर महिन्याला फक्त 210 रुपये जमा करावे लागतील.