Take a fresh look at your lifestyle.

संदिप रोहोकले यांची ग्राहक संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड !

पुण्यातील बैठकीत झाली निवडीची घोषणा.

पारनेर :तालुक्यातील भाळवणी येथील संदिप सयाजी रोहोकले यांची ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या नगर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच फेरनिवड करण्यात आली आहे.
भारत सरकार मान्य जलद सेवा ग्राहक संरक्षण परिषद समिती, दिल्ली समितीची पुणे येथे बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची फेरनिवड करण्यात आली. या निवडीचे पत्र देताना ग्राहक संरक्षण परिषद समिती, दिल्ली महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रवि बोरुडे, नगर जिल्हा उपाध्यक्ष रूपेश लोढा, पारनेर तालुकाध्यक्ष विपुल औटी, युवा नेते विपुल ठक्कर तसेच समितीचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ मान्यवर उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये समितीचे तसेच ग्राहकांच्या हिताचे मोठ्या प्रमाणावर काम करणार असल्याचे संदिप रोहोकले यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.