Take a fresh look at your lifestyle.

…तर अशी सुरु झाली ‘ख्रिसमस ट्री’ची प्रथा!

काय आहे या झाडाचे महत्व ? वाचाच !

नाताळ म्हटलं की भेट वस्तू, संता, मिठाई, केक, चर्चची भेट आणि ख्रिसमस ट्री. हा सण ख्रिसमस ट्री शिवाय साजरा होऊच शकत नाही. मात्र या दिवशी या झाडाचे खास महत्त्व का असते? चला, तर याबाबत आज जाणून घेऊयात…   
ख्रिसमस ट्री हे झाड सदाहरित वृक्षांच्या कुळातील असून त्याची पाने कधीच गळत नाही, सुकत नाहीत. हे झाड येशूचे प्रतीक मानले जाते. तसेच या झाडाबद्दल काही समजही प्रचलित आहेत. बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन, हॉलंड या देशात ख्रिसमस ट्री भूतांना पळवून लावणारे झाड म्हणून मानले जाते. त्यामुळे घरात अनेक कुटुंबे या झाडाच्या फांद्या लावत असतात.

आज तर घराघरात नाताळला ख्रिसमस ट्री सजविण्याची परंपराच पडलीय. अशा पद्धतीने झाड घरात लावण्याची सुरुवात जर्मनीतून झाल्याचे मानले जाते. ही पद्धत 19 व्या शतकात इंग्लंडमध्ये पोहोचली आणि मग जगभर गेली. अमेरिकेत जर्मन वंशाच्या नागरिकांनी ख्रिसमस ट्री ची प्रथा सुरू केली असे देखील बोलले जाते.
अशी देखील एक समज आहे की, अ‍ॅडमच्या बागेत हे झाड होते. मात्र इव्हने त्याचे फळ खाल्यानंतर याची वाढ थांबली. पुढे येशूच्या जन्मानंतर हे झाड पुन्हा बहरू लागले. हल्ली इंग्लंडमध्ये वाढदिवस, खास समारंभ अथवा जिवलगाच्या आठवणी प्रित्यर्थ हे झाड लावण्याची प्रथा आहे. ख्रिसमस ट्री वर सजावट करण्याच्या प्रथेचा संबंध मार्टिन ल्यूथर किंग यांच्याशी लावला जातो. सध्या हे झाड इलेक्ट्रीक माळांनी सजविले जाते.