Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸24 डिसेंबर 2021

0
▪️मेष : एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या.
▪️वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळचे मित्र भेटतील. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. 
▪️मिथुन : विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
▪️कर्क : हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा. करियर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल. गणेशाची आराधना करावी.
▪️सिंह : व्यवसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. प्रयत्नांची कास सोडू नये. हवी असलेली उत्तरे मिळतील.
▪️कन्या : धावपळीचा दिवस. मात्र धावपळ लाभदायक ठरेल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. जोडीदाराशी मतभेद टाळा.
▪️तूळ : उगाचच एखादी चिंता सातवेल. मानसिक दुर्बलता टाळावी. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे. मनातील संभ्रम दूर सारावा.
▪️वृश्चिक : कर्तुत्वाला वाव मिळेल. उगाच लपवा छपवी करू नका. बौद्धिक ताण जाणवेल. सामाजिक कामात मदत नोंदवाल.
▪️धनू : जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जुनी येणी प्राप्त होतील. कौटुंबिक जबाबदार्‍या चिकाटीने पार पाडाव्यात. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
▪️मकर : धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. कष्टाला मागे पडू नका.
▪️कुंभ : अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका.
▪️मीन : प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. वादाच्या मुद्यात अडकू नका. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे. आहारात अति तिखट पदार्थ टाळावेत.
Leave A Reply

Your email address will not be published.