Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल 2022 चा ‘मेगा लिलाव कधी होणार?

कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक ? जाणून घ्या!

अखेर आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाची तारीख निश्चित करण्यात आलीय. त्यानुसार 7 आणि 8 फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. मेगा लिलाव दुबईत होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र भारतातील कोरोनाची परिस्थिती ठीक राहिल्यास भारतातच लिलाव होणार आहे.
लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? :
● चेन्नई सुपर किंग्ज : 48 कोटी
● दिल्ली कॅपिटल्स : 47.50 कोटी
● कोलकाता नाईट रायडर्स : 48 कोटी
● मुंबई इंडियन्स : 48 कोटी
● पंजाब किंग्स : 72 कोटी
● राजस्थान रॉयल्स : 62 कोटी
● रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : 57 कोटी
● सनरायझर्स हैदराबाद : 68 कोटी
यावेळच्य आयपीएलमध्ये 8 नव्हे तर 10 संघ दिसतील. लखनऊचा संघ आरपी-संजीव गोएंका ग्रुपने तर सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद संघ खरेदी केला आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम अजून रंगतदार होणार आहे, एवढं नक्की!