Take a fresh look at your lifestyle.

… तर अजित पवार 4 दिवसात राज्यच विकून मोकळे होतील !

गोपीचंद पडळकरांनी साधला निशाणा.

मुंबई : ऐन कडाक्या थंडीत सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाने राज्यातला राजकीय पारा चांगलाच वाढवला असून,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्त्यावरून उठलेली राळ शमायच्या अगोदरच आता गोपीचंद पडळकरांनी त्यावरही कडी करणारे वक्तव्य केले आहे. यामुळे अधिवेशनात खरे मुद्दे कमी आणि राजकीय गुद्देच जास्त पाहायला मिळाले, तर काही वावगे वाटू देऊ नका.बुधवारी पडळकरांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत 4 दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका केलीय. यामुळे राजकीय ठिणग्या अजून बऱ्याच पडण्याची चिन्हे आहेत.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे.नेहमीप्रमाणेच यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरवात तापलेल्या वातावरणाने झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधक मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक सल्ले देत आहेत. या मुद्द्यावरुन भाजपाने सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने या टीकेला सुरूवात झाली आहे. त्यानंतर प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर अशा अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका केल्याचे पाहायला मिळाले.अनेकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा सल्ला दिला आहे. यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत 4 दिवसांत राज्य विकूनच मोकळे होतील, अशी कडवट टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनासाठी हजर राहू शकले नाहीत. त्यांनी काही काळ घरी बसून विश्रांती घ्यावी. काही काळ मुख्यमंत्रिपदाचा भार आदित्य ठाकरे किंवा अजित पवार यांच्याकडे सोपवावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राज्य अधांतरी असल्याचेही बोलले जात आहे.