सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या लग्नाची चर्चा रंगलीय. छत्तीसगडची राजधानी रायगडमध्ये बेडकाचं लग्न पार पडलंय. छत्तीसगडच्या ग्रामीण भागातील लोकांची अशी धारणा आहे की, दोन बेडकांचे लग्न लावले कि, चांगला पाऊस पडतो.
हाच विचार करून रायगड जिल्ह्यातील लैलुंगा ब्लॉकमधील बेस्किमुडा या गावात नर बेडूक आणि मादी बेडकाचा रितीरिवाजानं विवाह लावण्यात आला. हिंदू परंपरेत असणाऱ्या सर्व विधींसह हा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. विशेष म्हणजे या लग्नाच्या आमंत्रणासाठी लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या.
यावेळी गायन, वादनासह लोकांनी नृत्यावर ठेका धरला होता. वधूच्या बाजूने फ्रोघी गाव बेस्कीमुडामध्ये दाखल झाले होते. या ठिकाणी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. जवळपास 1000 हून अधिक ग्रामस्थांनी याच लाभ घेतला.