Take a fresh look at your lifestyle.

तुमचे पॅन कार्ड खरे आहे की खोटे?

घरबसल्या असे तपासून पहा !

विविध कारणास्तव अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की, आपला पॅन कार्ड क्रमांक खरा आहे की खोटा? घाबरून जाऊ नका . तुम्ही तुमचा पॅन कार्ड क्रमांक तपासून पाहू शकता. इन्कम टॅक्स विभागाने पॅन कार्डसाठी एक Quick Response (QR) सादर केला आहे. याची मदत घेऊन तुम्ही पॅन कार्डची सत्यता तपासू शकता… 
पॅन कार्डवर एक QR कोड असतो. ज्यावर पॅन कार्ड धारकाच्या माहिती असते. या QR कोडला स्कॅन करण्यासाठी युजरला PAN QR Code Reader App वापरावे लागते. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून QR कोड करुन कोणीही आपला पॅन क्रमांक खरा आहे की खोटा? हे तपासून पाहू शकते. मात्र त्यासाठी खालील टीप्स नक्की फॉलो करा…
● सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरुन PAN QR Code Reader अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्या.
● केवळ NSDL e-Governance Infrastructure Limited द्वारा जारी केलेले अ‍ॅपच अधिकृत आहे.
● आता अ‍ॅप ओपन करून Next वर क्लिक करा. त्यानंतर फिनिशवर क्लिक करा.
● आता कॅमेरा ओपन होईल. तुम्हाला स्क्रिनच्या मध्यभागी एक ग्रीन डॉट पाहायला मिळेल. कॅमेरा QR Code वर घेऊन या.

● आता तुम्हाला एवढेच लक्षात ठेवायचे आहे की, ग्रीन आयकॉन कोडच्या मध्यभागी असायला पाहिजे. स्कॅन झाल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिनवर सर्व माहिती उपलब्ध असेल. जी QR कोड ला लिंक असेल.
● अ‍ॅपच्या माध्यमातून पॅन कार्डच्या बाबतीत जाणून घेताना एक गोष्ट तुम्हाला जरुर लक्षात ठेवा. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला कमीत-कमी ऑटो फोक आणि 12MP कॅमेरा असलेला मोबाईल वापरावा लागेल. कॅमेरा आणि QR Code यादरम्यान कमीत-कमी 10 सेमी अंतर ठेवा. तुमचे पॅन कार्ड स्वच्छ ठेवा. जेणेकरुन QR Code खराब होणार नाही.