Take a fresh look at your lifestyle.

कुठयं पठ्ठ्या ? दानवेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख.

वाद चिघळण्याची शक्यता !

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे नेहमी आपल्या वादग्रस्त वकत्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवे यांनी बदनापूर येथे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. ते निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. मात्र, टीका करताना त्यांनी मुख्यमंत्र्याचा एकेरी शब्दात उल्लेख केला आहे.
रावसाहेब दानवेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून, 2 महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या काहीच सांगू शकत नाही कोणी, असं म्हणत मुख्यमंत्र्यांना एकेरी संबोधल आहे आहे. याशिवाय मुख्यमंत्री स्वत:च्या कुटुंबाचे जबाबदार आहेत की 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे, असा सवाल करीत मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे.
या 3 महिन्यात कोणत्या शिवसेना नेत्याला चार्ज दिला असता तर राज्याचा कारभार नीट चालला नसता का? असा प्रश्नही दानवे यांनी यावेळी विचारला आहे. शिवाय त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधताना “बिना मुख्यमंत्र्याचं कुठं राज्य चालतं असत का?” असा टोलाही लगावला आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवें यांनी राज्य सरकारवर टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात अन्नधान्याचा किती साठा आहे याची माहिती घेतली होती. त्यानुसार त्यांनी कोरोना काळात मोफत अन्न देण्याची सुचनाही केली होती, अशी महिती दानवेंनी यावेळी दिली.