Take a fresh look at your lifestyle.

सदगुरु कृपेशिवाय आत्मज्ञान नाही !

ज्ञानमार्गातला मुख्य दरवाजा म्हणजे गुरु.

गुरु जीवनात असल्याखेरीज ज्ञान होत नाही,क्षेत्र कोणतही असो.पोट भरण्याच्या सर्व विद्या शिकण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो.त्यात आपण यश संपादन करतोच.मनुष्यासाठी ते अटळ आहे. चरितार्थ चालवण्यासाठी हे करावच लागतं.कोणत्याही गोष्टीसाठी गुरु आवश्यक आहेच.गुरु अनेक प्रकारचे आहेत, समर्थ म्हणतात,मंत्र, तंत्र, वस्ताद,राज,कुळ,मानलेला,विद्या,कुविद्या,असद्,याती,माता,पिता,राजा,देव असे सतरा प्रकारचे गुरु आहेत याशिवाय स्वप्नगुरु, प्रतिमागुरु,दिक्षागुरु,स्वयेगुरु असेही गुरुंचे प्रकार आहेत.पण मोक्षदाता सदगुरु या सर्वांहुन श्रेष्ठ आहे.
नाथ महाराज म्हणतात, न होतां गुरुकृपा संपूर्ण । कदा न साधे आत्मज्ञान । त्या गुरुत्वालागी नारायण । आपुलें आपण स्वरुप दावी ॥५०॥
नसेवितां सदगुरुचरण । स्रष्टयासी नव्हे ब्रह्मज्ञान । त्या गुरुत्वाचें महिमान । श्रीनारायण स्वये दावी ॥५१॥
मागे उपदेशिलें ‘ तप तप ’ । परी प्रत्यक्ष नव्हे सदगुरुरुप । गुरुकृपा नव्हतां सद्रूप । शिष्याचे विकल्प न तुटती कदा ॥५२॥
संतोषोनी सदगुरुनाथ । शिष्याचे माथां जों न ठेवी हात । तोंवरी नातुडे परमार्थ । हा निश्चितार्थ हरि जाणे ॥५३॥
यालागी श्रीनारायण । गुरुत्वें आपुलें आपण । शिष्यासी देऊनी दर्शन । स्वयें ब्रह्मज्ञान उपदेशितसे ॥५४॥
ब्रम्हज्ञान हेच आत्मज्ञान आहे. आत्मसाक्षात्कार ब्रम्हज्ञानानेच होतो.पण इथपर्यंतचा प्रवास आपोआप होत नाही. त्याचा मुख्य दरवाजा गुरुच आहे. एक एक पायरी योग्य रितीने चढत गेलं की आत्मज्ञानापर्यंतचा प्रवास करता येतो.त्यासाठी गुरुवर अविचल निष्ठा असली पाहिजे.
निष्ठें केली तपस्थिती । तेणें झाली सदगुरुप्राप्ती । आतां गुरुमुखें प्रजापती । आत्मज्ञानप्राप्ती पावेल पां ॥५५॥
जैं पूर्वपुण्याची निष्काम जोडी । हैं सदगुरुचरण जोडिती जोडी । गुरुचरणी आवडी गाढी । तैं पाविजे रोकडी ब्रह्मप्राप्ती ॥५६॥

गुरुविषयीं लवमात्रहि विकल्प उपयोगी नाहीं
गुरुच्या ठायी नींचपण । शिष्यें देखिले असे जाण । अणुमात्र केलिया हेळण । ब्रह्मज्ञान कदा नुपजे यालागी।।
गुरुवरील श्रद्धा आपण या जन्मात कार केले पाहिजे याचं स्मरण करुन देईल. मुख्य कर्माचा पडलेला विसर अविद्या आहे. आत्मज्ञान हाच मुख्य विचार आहे. त्मानेच भवसागर पार करणे शक्य आहे.
रामकृष्णहरी