Take a fresh look at your lifestyle.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरात लगीन घाई !

मुलगा प्रतापसिंह 24 डिसेंबरला विवाह बंधनात ! 

श्रीगोंदा: तालुक्याचे आमदार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरात सध्या लग्नाची धामधूम चालू आहे. पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह हा इंद्रजीत यादव सरकार यांची कन्या इंद्रायणी हिच्याशी विवाहबद्ध होत आहे. येत्या 24 डिसेंबर रोजी हा विवाह संपन्न होत आहे.
“हितचिंतक आणि कार्यकर्ते व सहकाऱ्यांना या नवदांपत्यास शुभाशीर्वाद देण्याची आणि आनंद सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा आहे मात्र पाचपुते कुटुंबाचा घटक असणारे सदाअण्णा यांच्या जाण्यामुळे व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणि ओमायक्रोन या नव्या विषाणूचा धोका लक्षात घेता हा शुभविवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न करावा लागत आहे.
मनोमन इच्छा असूनही आपणास सर्वांना निमंत्रण देता येत नाही. याबद्दल मनात नक्कीच खेद आहे. तरीही आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद गृहीत धरूनच हा शुभविवाह पार पडत आहे,” असे श्री पाचपुते यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा विवाह अत्यंत साधेपणाने साजरा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.