Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ बॉलीवूड स्टार घरभाड्यातून कमवतात लाखो रुपये..!

चला, तर सविस्तर जाणून घेवू या.

बॉलीवूड कलाकारांच्या बातम्या म्हणजे चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय. सेलिब्रेटींच्या मालमत्ता कुठे आहेत? ते कसे कामे काय करतात? असे प्रश्न अनेकांना पडतो. काही बॉलीवूड सेलेब्रिटी तर घरे भाड्याने देऊन लाखोंची कमाई करतात. चला, तर त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…  
● अमिताभ बच्चन : यांनी एक अलिशान डुप्लेक्स नोव्हेंबरमध्ये कृती सेननला दोन वर्षासाठी भाडे कराराने दिला आहे. त्यापोटी त्यांना दरमहा 10 लाख रुपये भाडे मिळते. यासाठी कृतीने 60 लाख रुपये डीपॉझीट भरले आहे, असेही समजते.
● काजोल : हिने तिची पवईमधली 771 चौरस फुटाची सदनिका नुकतीच भाड्याने दिली असून त्यासाठी दरमहा 90 हजार रुपये भाडे घेतले जात आहे.
● अभिषेक बच्चन : याने त्याचा जुहू येथील बंगल्याचा तळमजला 15 वर्षाच्या कराराने भाड्याने दिला असून त्याला दरमहा 18.9 लाख रुपये भाडे मिळते.
● सलमान खान : त्याने त्याची बांद्रा येथील एक सदनिका भाड्याने दिली असून त्याला या जागेचे 8.25 लाख रुपये भाडे दरमहा मिळते. अन्य एका सदनिकेसाठी त्याला दरमहा 90 हजार रुपये भाडे मिळते.
● सैफ अली खान : यानेही बांद्रा येथील त्याची एक सदनिका दरमहा 3.6 लाख रूपये भाड्याने दिली आहे.
● दिग्दर्शक रोहित शेट्टी : यालाही त्याच्या बांद्रा मधील जागेचे दरमहा 5 लाख रुपये भाडे मिळते.
● करन जोहर : याने त्याच्या दोन व्यावसायिक मालमत्ता भाड्याने दिल्या असून त्यापोटी त्याला दरमहा 17.5 आणि 6.15 लाख रुपये भाडे मिळते.