Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸21 डिसेंबर 2021

 

▪मेष : वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. 
▪️वृषभ : घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. अति विचार करू नयेत.
▪️मिथुन : दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील. आपल्या कामात हुशारी दाखवावी.
▪️कर्क : दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे.
▪️सिंह : संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत. अपेक्षित उत्तराची वाट पहाल.
▪️कन्या : जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा.
▪️तूळ : काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल.
▪️वृश्चिक : काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील.
▪️धनू : नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
▪️मकर : सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल. भावंडांशी मतभेद संभावतात.
▪️कुंभ : गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून लाभ संभवतो. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा.
▪️मीन : कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा.