Take a fresh look at your lifestyle.

तहसीलदार देवरेंच्या बदलीनंतरही शुक्लकाष्ठ थांबता थांबेना !

लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल.

 

 

पारनेर : तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी व वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या करण्याचा इशारा देणारी स्वतःच्या आवाजातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या भावनिक इशाऱ्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर देवरे यांची काल बदली होवूनही त्यांच्यामागील शुक्लकाष्ठ थांबेनाच.आ. लंके यांचे कट्टर समर्थक कारभारी पोटघन यांनी देवरे यांनी पदाचा गैरवापर करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत विभागाकडे केली आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या संदर्भात गंभीर आरोप करत आत्महत्या करू या आशयाची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या पारनेरच्या बदली झालेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्याचे सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्यामार्फत ही तक्रार आज दाखल करण्यात आली आहे. देवरे यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे, वाळू तस्करीच्या कारवाईबाबतीत अनियमतता समोर आल्याचे या तक्रारीत म्हटलेले आहे.

दरम्यान याबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देवरे यांचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. एकंदरीत याबद्दल असलेले पुरावे या आधारे तक्रारदार माजी सैनिक कारभारी पोटघन यांनी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी बोलताना वकील असीम सरोदे यांनी चौकशीची मागणी करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान देवरे यांच्या ऑडीओ बद्दल पत्रकारांनी विचारले असता देवरे यांनी भावनिकतेचा मुद्दा पुढे करू नये असा सल्ला त्यांनी दिला.सोबतच काम करत असताना एखाद्या महिला अधिकाऱ्यांनी त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर मी त्यांच्या पाठीशी एक वकील म्हणून उभा राहील असे त्यांनी म्हटले आहे.