Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही कॉफी पिता का ? 

मग एकदा फायदे आणि तोटे वाचाच!

चहा सोबत अनेकांना कॉफीचे देखील भलतेच वेड असते. कॉफी पिण्याचे अनेक फायदे तसेच जास्त प्रमाणात पिण्याचे तोटे देखील आहेत. चला, तर दोन्ही गोष्टींवर नजर टाकूयात…     
‘हे’ आहेत फायदे :
● मांसपेशींचा त्रास कमी होतो.
● अस्थमा आणि मधूमेहाचा धोका कमी राहतो.
● मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
● हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत मिळते.
‘हे’ आहेत तोटे :
● अधिक सेवनामुळे अनिद्रा, चिंता, सारखी लघवी येणे, या समस्या उद्भवू शकतात.
● भूक कमी लागते. त्यामुळे वेळेवर खाल्ले जात नाही. या सगळ्याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो.
● अधिक कॉफी प्यायल्याने हाडांचे नुकसान होऊ लागते.
● कॉफीमध्ये कॅफिन हा उत्तेजनक घटक असल्याने अतिवापर टाळाच.