Take a fresh look at your lifestyle.

स्वार्थ विनाश घडवतोच !

अध्यात्म निस्वार्थ जगायला शिकवते.

 

कैकयीने मंथरेचा संग केला.आणि स्वार्थ डोक्यावर बसला.मग भरताला राजगादी मिळावी,यासाठी काय,काय केलं? रामावर अत्यंत प्रेम असुनही वनवासाला पाठवलं.डोक्यात फक्त हाच विचार होता,आता भरत राजा होणार.पण नशिबी काय आलं?राजा दशरथाचं निधन.परिणाम,स्वतःला वैधव्य,लक्ष्मण,सितेला वनवास, ज्याच्यासाठी हे सारं केलं त्या भरतानही,राजगादीचा स्विकार केला का?त्यानही संन्यस्त वृत्तीत चौदा वर्षे घालवली भरताच्या दुःखाला आईच कारण ठरली….
आपणही आपल्या मुलांबाबत काहिसे असेच वागत असतो.मागच्या वर्षी मित्राचा मुलगा दहावीला होता. म्हणाला,”मुलगा दहावीला आहे.खुप मोठी स्पर्धा आहे.म्हणुन त्याला स्वतंत्र रुम घेतली आहे”.मी समजलो नाही.स्पर्धा कसली?
तो म्हणाला,”अरे अजुन पाच मुलं त्याच्या वर्गात आहेत.जी पहिल्या क्रमांकाने पास होत आली आहेत.त्यांच्या पुढे हा गेलाच पाहिजे…आता मित्राची भेट झाल्यावर कळालं,मुलगा परीक्षेलाच बसु शकला नाही.तो खुप आजारी आहे.घरामधले सर्वच तणावात आहेत. त्याच्या आईने खुप स्वप्नं पाहिली होती.तिही खुप अपसेट आहे….तुलना भरताशी करायला हरकत नाही.
घरात राहुनही हा वनवास नाही का?बाप जीवंत असुनही नरकयातना भोगत नाही का? पुढे जरुर जा.पण कुणाच्या तरी पुढे जायचय हा विचार करताना रामायणाचा हा पाठ लक्षात असुद्या.
रामकृष्णहरी