Take a fresh look at your lifestyle.

‘हॅपी ख्रिसमस’ ऐवजी ‘मेरी ख्रिसमस’ का म्हणतात?

या मागचा इतिहास वाचाच!

डिसेंबर महिना उजाडला की, जगभरात ‘मेरी ख्रिसमस’चे धूम सुरु असते. ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत लोक एकमेकांना शुभेच्छा देतात, भेटकार्ड देतात. मात्र ‘मेरी ख्रिसमस’ का बोललं जातं. मात्र याचं कारण तुम्हांला माहित आहे का? चला, तर याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात..   
युरोपात 18व्या आणि 19व्या शतकात नाताळच्या शुभेच्छा ‘हॅपी ख्रिसमस’ बोलून दिल्या जात. इंग्लंडमध्ये आजही लोक नाताळच्या शुभेच्छा ‘हॅपी ख्रिसमस’ बोलूनच देतात. याशिवाय ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनीही ‘हॅप्पी ख्रिसमस’ हा शब्द वापरला होता. तसे पहिले तर ‘हॅपी’ आणि ‘मेरी’ या दोन्हींचा अर्थ ‘आनंद’ असाच आहे. सध्या ‘मेरी’ हा शब्द अधिक प्रचलित आहे.
‘मेरी’ हा शब्द प्रसिद्ध होण्यामागे साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांची मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते. सुमारे 175 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘अ ख्रिसमस कॅरोल’ या पुस्तकात ‘मेरी’ हा शब्द सर्वाधिक वापरला गेला होता. यानंतर हे पुस्तक जगभर वाचले गेले आणि ‘हॅप्पी’च्या जागी ‘मेरी’ शब्दाची प्रथा सुरू झाली. त्यामुळे तुम्‍ही ‘मेरी ख्रिसमस’ ऐवजी ‘हॅपी ख्रिसमस’ म्हटले तरी त्यात काहीही गैर नाही.