Take a fresh look at your lifestyle.

डिंभे धरण ओव्हरफ्लो.. !

घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु!

 

 

शिरूर : पुणे आणि नगर जिल्ह्यांना वरदान ठरलेले डिंभे धरण अखेर 100% भरले आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असल्याने धरण पुर्णपणे भरले आहे.अजुन दोन दिवस धरणक्षेत्र परीसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याने धरणातून घोडनदी पात्रात विसर्ग सुरु केला गेला आहे.

सोमवारी दुपारी तीन वाजता धरणाचे पाच दरवाजे उघडले असून पाच हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग घोडनदीपात्रात चालू केला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नदीमध्ये विसर्ग वाढण्यात येईल, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसिलदार रमा जोशी यांनी केले आहे.

डिंभे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे.मागच्या आठवड्यात या परीसरात पाऊस पडत असला तरी त्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते.पण दोन दिवसांपासुन जोरदार पावसाला  सुरूवात झाल्याने डिंभे धरणात सुमारे 5 हजार 500 क्युसेक्स या वेगाने पाण्याची आवक होऊ लागल्याने धरण पुर्णपणे भरले होते.ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धरणाचे पाचही दरवाजे उघडुन घोडनदीपात्रात पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडले आहे.