Take a fresh look at your lifestyle.

पतसंस्थांमुळे ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम !

आमदार निलेश लंके यांचे मत.

पारनेर – पतसंस्थांमुळे ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत झाल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

छत्रपती संभाजी राजे ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या बेलवंडी फाटा येथील शाखेचा शुभारंभ आ.लंके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर हे होते .यावेळी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष औटी,पारनेरचे सहाय्यक निबंधक गणेश औटी, दूध संघाचे संचालक नानासाहेब लोखंडे ,गुरुदत्त मल्टीस्टेटचे चेअरमन बा. ठ.झावरे ,गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंद, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे, गुरुकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे ,नगरपंचायत उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले की पतसंस्थांनी ग्रामीण भागातील छोटे उद्योजक, व्यापारी, व्यवसायिक यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक पुरवठा केल्याने ग्रामीण भागाची प्रगती होण्यात मदत झाली आहे. या संस्थेने अल्पावधीतच आर्थिक क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली. त्यामुळे संस्थेची पाचवी शाखा या ठिकाणी सुरू होत असल्याचे सांगत संस्थेचे चेअरमन संभाजी औटी हे शिक्षक असल्याने कमी कालावधीमध्ये थकीत कर्जवसुली, नवीन शाखा उघडणे ,नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा देणे ,चांगले व्याजदर ,विनम्र सेवा यामुळे संस्थेने थोड्या दिवसात खूप प्रगती केली .शिक्षकांच्या पतसंस्था समाजात चांगले काम करून आदर्श निर्माण करीत आहेत असेही आ. लंके म्हणाले.

अध्यक्षपदावरून बोलताना शिक्षक नेते तथा प्रसिद्थ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी शिक्षक व पतसंस्था यांचा जवळचा संबंध आहे. शिक्षक पदाधिकारी असणाऱ्या संस्था चांगली प्रगती करतात. याची अनेक उदाहरणे आहेत .त्यांनी आपल्या विनोदी शैली मध्ये शिक्षकांचे अनेक किस्से सांगितले .यावेळी शिक्षक नेते रा .या .औटी , सहाय्यक निबंध गणेश औटी, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे, सुदर्शन शिंदे, उपनगराध्यक्ष नगरसेवक दत्तात्रय कुलट, नंदकुमार औटी, सरपंच बाळासाहेब सोनवणे, माजी सरपंच संतोष यादव ,सुभाष यादव, अशोक ईश्वरे, रावसाहेब दरेकर ,भास्कर नरसाळे ,अंबादास झावरे, तबाजी सासवडे ,दत्तात्रय जाधव, कालिदास भोगाडे, संदीप शिंदे यांनी संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक चेअरमन संभाजी औटी म्हणाले की संस्था आमच्या ताब्यात आलेली साडेतीन वर्षे झाले असून या कालावधीत संस्थेने कर्ज वसुली, तसेच अवसायनात दोन संस्था विलीनीकरण करून घेतल्या त्यांची थकीत कर्जवसुली ,तसेच नवीन शाखा सुरू करणे, त्या शाखा चांगल्या पद्धतीने चालवणे ही सर्व कामे संस्थेने केलेली आहेत. संस्था उत्तम प्रकारे काम करून प्रगतीपथावर आहे. असे श्री.औटी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक धोंडीबा औटी ,अरुण बडे ,शरद शेरकर, हरिभाऊ देशमाने ,अरुण रेपाळे, बाळासाहेब पुजारी ,शंभू दुधाडे,शिवाजी काकडे ,मॅनेजर अशोक ठुबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

नगरसेवक डॉ. मुदस्सर सय्यद नंदकुमार औटी, आनंदा औटी,वाडेगव्हाणचे सरपंच बाळासाहेब सोनवणे ,यादव वाडीच्या सरपंच सौ .मीना यादव, माजी सरपंच संतोष यादव, पुणेवाडीचे सरपंच बाळासाहेब रेपाळे ,भाजपाचे सरचिटणीस अशोक ईश्वरे, रावसाहेब दरेकर, सुभाष यादव ,गणपत देठे, अंबादास झावरे, सुनील नरसाळे, सोपान राऊत ,रवींद्र रोकडे अश्फाक शेख राजेंद्र दाते, हिम्मत चेमटे ,नारायण बाचकर, उद्योजक बाळासाहेब राक्षे, नगर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष मधुकर मैड, गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांचा सन्मान यावेळी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये रामदास नरसाळे (पारनेर), राजेंद्र पोटे (श्रीगोंदा) ,तुकाराम आडसुळ (पाथर्डी) या शिक्षकांना गौरवण्यात आले. विशेष म्हणजे हे तीनही पुरस्कार जाहीर झालेले शिक्षक हे पारनेर तालुक्याचे रहिवाशी आहेत.