Take a fresh look at your lifestyle.

नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर…!

'अशी' आहे पदाची पात्रता

 

भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालायच्या अधीन आणि देशातील सर्वाधिक मोठी कंपनी ओएनजीसी लिमिडेटमध्ये नोकर भरती केली जाणार आहे.
नोटिफिकेशननुसार, एचआर एक्झिक्युटिव्हच्या 15 आणि पब्लिक रिलेशन ऑफिसरच्या 6 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती युजीसी नेट जून 2020 च्या गुणांच्या आधारवर केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी संबंधित विषयात युजीसी द्वारे आयोजित NEET जून 2020 रोजी उत्तीर्ण झालेले असावे. त्याचसोबत एचआर एक्झिक्युटिव्हसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेतून एचआर संबंधित विषयात एमबीए कमीत-कमी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावे. त्याचसोबत पीआरओसाठी उमेदवाराने जर्नलिज्म आणि मास कम्युनिकेशनमध्ये पीजी डिग्रीत कमीत-कमी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावे.
अर्ज करण्याची मुदत 4 जानेवारी 2022 पर्यंत आहे. यासाठी उमेदवारांना 300 रुपयांचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. अर्जासाठी उमेदवारांनी कंपनीची अधिकृत वेबसाईट ongcindia.com येथे भेट द्यावी. येथे देण्यात आलेल्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता.