Take a fresh look at your lifestyle.

माजी आमदार पोपटराव गावडे यांचा २५ डिसेंबरला अभिष्टचिंतन सोहळा !

शरद पवारांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती.

शिरूर : शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा ८० वा अभिष्टचिंतन सोहळा येत्या २५ डिसेंबर रोजी टाकळी हाजी येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते श्री.गावडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. 

राज्यमंत्री दत्तामामा भरणे, खासदार अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार आदींसह जिल्ह्यातील सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. सध्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत नुकतीच एक बैठक टाकळी हाजी येथे पार पडली.
श्री.गावडे यांचे शिरूर तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान योगातीत आहे. तालुक्याच्या राजकारणात कायम सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारे कुटुंब म्हणून गावडे कुटुंबाची जिल्ह्यात ओळख आहे. जिल्हा परिषदेत तब्बल ५२ वर्षे प्रतिनिधीत्व करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर त्यांचा बेट भाग आंबेगावला जोडण्यात आला त्यानंतर ही त्यांनी दिलीप वळसे पाटीलांना मोलाची साथ दिली.

गावच्या सरपंच पदापासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, शिरुरचे आमदार, राज्य विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक अशा विविध पदांवर काम करीत त्यांनी तळागाळातील गोरगरीबांना कायम मदतीचा हात दिला.
“आमदार पोपटराव गावडे यांच्या राजकीय कारकीर्दीला ६० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने आम तालुक्यातील जनतेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे” असे आवाहन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले आहे.