Take a fresh look at your lifestyle.

बाळ बोठे विरोधात ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी !

रूणाल जरे यांचे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन.

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी,पत्रकार बाळ बोठे याच्यावर आणखीही विविध गुन्हे दाखल असूनही तरीही आत्तापर्यंत त्याच्या स्वभावात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे बोठे याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी रुणाल जरे व अॅड.सचिन पटेकर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
📌 यासंदर्भात पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले की…
आरोपी नामे बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध विविध पोलीस स्टेशनला विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच आरोपीचा १० वर्षाचा इतिहास पाहिला असता त्याच्या विरुध्द यापुर्वी देखील विविध पोलीस स्टेशनला गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच सदर आरोपी याचे स्वभावामध्ये आजपावेतो कोणताही बदल झालेला नाही. आरोपी विरुध्द हप्ता,खंडणीसाठी अपहरण, सुपारी देणे, खून याच्यासारखे गंभीर संघटीत गुन्हयाचा लेखाजोखा त्याच्या मागावर आहे. तसेच विविध टोळयाशी त्याचा डायरेक्ट संबंध आहे. त्यामुळे सदर आरोपी याला पोलीसांचा धाक राहिलेला नसून सदर आरोपी हा पोलीसांना खिश्यात घेवुन फिरतो तसेच न्यायाधिशांची देखील बदली मी करु शकतो एवढया पर्यंत देखील त्याची मजल गेलेली आहे.
सदर आरोपी विरुध्द मोक्याच्या नियमा प्रमाणे दोन आणि दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असुन त्यातील काही गुन्हे आजपावेतो प्रलंबित आहे. व इतर गुन्हे दमदाटी करुन मिटविण्याचा प्रकार देखील सदर आरोपीकडून होत आहे.
१) गुन्हा रजि.क्र. ४७८/२०२० सुपा पोलीस स्टेशन, भा द वि कलम ३०२, १२०ब, ३४ नूसार
२) गुन्हा रजि.क्र.६५७५/२०२० कोतवाली पोलीस स्टेशन, भा द वि कलम ३५४, ३५४ड
३) गुन्हा रजि.क्र.७७४३/२०२० तोफखाना पोलीस स्टेशन, भा द वि कलम ३८४ ३८५, ५००, ५०१, ३४
४) गुन्हा रजि. क्र. २५५/२०२१ पारनेर पोलीस स्टेशन, भा द वि कलम ३४, Prisons Act ४२, ४५, १२, ४६
५) अ.नगर.जिल्हा न्यायालयात SCC. Noवि कलम ५००, see
६) गुन्हा रजि. क्र. १८३/१९६६ राहुरी पोलीस स्टेशन, भा द वि कलम १९३.४५५०४, ५०६
वरील प्रमाणे गंभीर गुन्हा इतर गंभीर गुन्हे सदर आरोपी विरुध्द दाखल असुन सदर आरोपी हा अट्टल गुन्हेगार असुन त्यास राजकिय वरदहस्त असल्यामुळे आरोपीवर आजपावेतो मोक्या अंतर्गत कारवाई झालेली नाही. सदर गुन्हे पाहता हे अत्यंत गंभीर असुन सदर आरोपी मोक्या अंतर्गत आरोपीचे मुसक्या आवळण्याची वेळ आलेली आहे.
सदर आरोपी हा पांढरपेशा गुन्हेगार असुन विविध वाममार्गाने बक्कळ पैसा गोळा करून विविध ठिकाणी स्थावर मालमत्ता कमविलेली आहे व पैशाच्या जोरावर वरील प्रमाणे गंभीर गुन्हे करण्यास धजावत नाही. आरोपीला कायदयाचा व पोलीसांना धाक राहिलेला नसुन त्यामुळे सदर आरोपी वरील प्रमाणे गुन्हे करीत गेलेला आहे. त्यामुळे पोलीसांना देखील सदर प्रकार डोकेदुखी ठरत आहे. त्याच्यामुळे आवश्यक व गरजेचे झालेले आहे.सदर आरोपी विरुध्द मोक्या अंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे.
नगरचा इतिहास पाहिले असता यापुर्वी पोलीसांनी संघटीत व असंघटीत गुन्हेगारांवर एक आणि एकापेक्षा जास्त असलेल्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्यामुळे सदर आरोपी विरुध्द पोलीसांनी सबळ पुरावे गोळा करून त्याची समाजामध्ये असलेली दहशत मोडून काढून व आजपर्यंत ज्यांना ज्यांना त्रास दिला आहे त्यांचे जाब जबाब घेवुन त्यांच्या पाठीशी उभा राहणे हे पोलीसांचे देखील काम आहे. त्यामुळे आरोपीची समाजामध्ये असलेली दहशत कमी होणार आहे. तसेच अहमदनगर येथील मोक्का विशेष न्यायालयात आरोपी विरुध्द सब्बळ पुरावे दाखल करून आरोपी विरुध्द मोक्का अंतर्गत खटला चालवुन आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न करावा.
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार कायदा कलम २३ (१) नुसार मा. पोलीस उपमहासंचालकांकडे आपण सदर आरोपी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी लवकरात लवकर कागदपत्रांची जुळवा जुळव करुन मंजुरी घेण्यात यावी. तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालकाकडे सदर आरोपपत्र पाठवुन त्यांची देखील परवानगी घेवुन सदर आरोपी विरुध्द व त्यांच्या टोळी विरुद्ध आरोपपत्र दाखल करावे. तसेच खटला हा विशेष मोक्का न्यायालयात जलद गतीने चालविण्यात यावा.
अहमदनगर येथील मोक्का विशेष न्यायालयात आरोपी विरुद्ध सब्बळ पुरावे दाखल करुन आरोपी विरुद्ध मोक्का अंतर्गत खटला चालवुन आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न करावा तसेच सदरची प्रक्रिया ही तात्काळ चालु करण्यात यावी.