Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 14 सप्टेंबर 2021

 

 

▪️मेष : अतिविचार करत राहू नये. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल.

▪️वृषभ : हातातील कलेचे कौतुक केले जाईल. सामाजिक बांधीलकी विसरून चालणार नाही. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल.

▪️मिथुन : कामातून समाधान मिळेल. मित्रांचा रोष गोडीने कमी करावा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल.

▪️कर्क : नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. हातात नवीन अधिकार येतील.

▪️सिंह : नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्‍यांच्या प्रयत्नाला यश येईल.

▪️कन्या : आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

▪️तूळ : संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.

▪️वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

▪️धनु : खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. क्रोधवृत्तीत वाढ होईल.

▪️मकर : आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मिळकतीच्या बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. इतरांच्या विश्वासाला खरे उतरा.

▪️कुंभ : मन प्रसन्न राहील. नवीन ओळख वाढवावी. दिवस धावपळीत जाईल. भावंडांची मदत मोलाची ठरेल.

▪️मीन : गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल.