Take a fresh look at your lifestyle.

…अन्यथा वाहन चालकांना होईल दुप्पट दंड!

वाहतुकीचे नवीन नियम जाणून घ्याच.

आता वाहन चालकांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या दंडात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात…  
● वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळेस 500 रुपये तर दुसऱ्या वेळेस 1500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

● परवाना नसताना वाहन चालवले तर तब्बल 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पूर्वी यासाठी केवळ 500 रुपयांची तरतूद होती.
● वाहनांचे अधिकृत कागदपत्रे नसतील तर तुमच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. आता ही रक्कम 5 हजार रुपये करण्यात आली आहे.
● आता विनाकारण हॉर्न वाजल्यास पहिल्यावेळी 500 तर दुसऱ्यावेळी तब्बल 1500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल.
● नाहेल्मेट गाडी चालवताना आढळल्यास पहिल्यावेळेस 500 रुपयांचा तर दुसऱ्या वेळेला दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. पूर्वी ही रक्कम केवळ 500 रुपये इतकी होती.
● वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना एक हजार तर चार चाकी वाहन मालकांना दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
परिवहन विभाग नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना 13 डिसेंबर 2021 पासून लागू केली आहे. त्यामुळे आता वाहन चालवताना नियम पाळणे गरजेचे आहे. अन्यथा दंडाचा मोठा फटका बसेल एवढं नक्की!